Crime : खुनाचा प्रयत्न करून पळून जाणाऱ्या दोघांना चालत्या ट्रेनमधून अटक

221
Crime : खुनाचा प्रयत्न करून पळून जाणाऱ्या दोघांना चालत्या ट्रेनमधून अटक
Crime : खुनाचा प्रयत्न करून पळून जाणाऱ्या दोघांना चालत्या ट्रेनमधून अटक

रत्नागिरीजवळील भाट्ये येथे धारदार शस्त्राने गळ्यावर वार वरून तरुणाच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या झारखंड येथील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी माणगाव (जि. रायगड) पोलिसांच्या मदतीने माणगाव रेल्वे स्थानकात ताब्यात घेतले. त्यानंतर माणगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज भोसले (Manoj Bhosale) यांनी ही कामगिरी केली. (Crime)

रत्नागिरी शहरातील भाट्ये समुद्रकिनारी तरुणाच्या खुनाचा प्रयत्न गेल्या १० ऑक्टोबर रोजी झाला. किनाऱ्याजवळ असणाऱ्या पोलीस तपासणी नाक्यावर एक अनोळखी व्यक्ती रक्तबंबाळ अवस्थेमध्ये मदत मागण्यास आली. तिच्या अवस्थेवरून पोलिसांच्या लक्षात आले की, या व्यक्तीवर अज्ञात इसमांद्वारे गंभीर स्वरूपाचा हल्ला करण्यात आलेला आहे. पोलिसांनी त्याला उपचारासाठी तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. जखमी तरुणाला गळ्याजवळ गंभीर इजा झाल्याने आपल्यावर कोणी हल्ला केला याबाबत सांगता आले नाही.

(हेही वाचा – Baba Siddique Murder प्रकरणी एका आरोपीला 7 दिवसांची पोलीस कोठडी; दुसऱ्याचा मात्र अल्पवयीन असल्याचा दावा)

या घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेमधील अंमलदारांना या गंभीर गुन्ह्याची तत्काळ उकल करण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली. या पथकामार्फत जखमी इसमाची तसेच हल्लेखोरांबाबत सर्व प्रकारची माहिती काढण्यात आली. जखमी इसम गोव्यातून रत्नागिरीत आला होता. हल्लेखोर हे मूळचे झारखंड येथील रहिवासी असल्याचे आणि रत्नागिरी एमआयडीसीतील एका नामांकित कंपनीत कामाला असल्याचे तांत्रिक माहितीच्या आधाराने पोलिसांनी शोधून काढले. (Crime)

या पथकामार्फत कंपनीमधील हजर आणि गैरहजर कामगारांची माहिती काढण्यात आली. त्यात असे निष्पन्न झाले की, दोन व्यक्ती कंपनीमध्ये १० ऑक्टोबर रोजी अनुपस्थित होत्या. घटनेनंतर दुसऱ्या दिवशी ११ ऑक्टोबर रोजी दुपारी आपले सर्व साहित्य घेऊन पळून जाण्याच्या उद्देशाने निघून गेले आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेमार्फत या दोन्ही व्यक्तींना शोधून त्यांची ओळख पटवण्यात आली व लागलीच रत्नागिरी रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यातून लक्षात आले की, दोन्ही संशयित व्यक्ती भावनगर एक्स्प्रेस (Bhavnagar Express) ट्रेनमध्ये बसून मुंबईच्या दिशेने निघून गेले आहेत. (Crime)

(हेही वाचा – Gondia junction : महाराष्ट्रातील महत्त्वाचे रेल्वे स्थानक)

काही तासांत भावनगर एक्स्प्रेस (Bhavnagar Express) रत्नागिरीतून रायगड जिल्ह्याच्या हद्दीमध्ये विनाथांबा जाणार असल्याचे लक्षात येताच माणगाव पोलिसांची आणि रेल्वे पोलीस दलाची मदत घेऊन माणगाव स्टेशनवर दोन्ही संशयितांना गाडीतून ताब्यात घेण्यात आले आहे. कार्तिक जानकी दिगार (वय २३, रा. तोला आंबेडकर नगर, गाव-तंत्री, टुपकाढी जरिध, जिल्हा बोकारो- झारखंड) आणि एक महिला, मूळ राहणार रा. फुसरो बाजार, जिल्हा बोकारो- झारखंड अशी त्या दोघांची ओळख पटली. गुन्ह्याचा तपास सुरू आहे. (Crime)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.