उबाठा, एमआयएमचा व्होट जिहाद kirit somaiya यांनी केला भांडाफोड ; लाखो बांगलादेशींना दिले जन्म प्रमाणपत्र

94
उबाठा, एमआयएमचा व्होट जिहाद kirit somaiya यांनी केला भांडाफोड ; लाखो बांगलादेशींना दिले जन्म प्रमाणपत्र

राज्यात दोन लाख बांगलादेशी (Bangladeshi Infiltrators) रोहिंग्या (Rohingya) मुस्लीमांना बनावट जन्म प्रमाणपत्र देण्यात आले आहेत. मालेगावपासून याची सुरुवात झाली असल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला आहे. लोकसभा-विधानसभा निवडणुकी दरम्यानच्या चार-पाच महिन्यांच्या काळात महाराष्ट्रात दोन लाख बांगलादेशी रोहिंग्यानी अर्ज केला. त्यापैकी १ लाख जणांना उशिरा जन्म प्रमाणपत्र देण्यात आले आहे, असं सोमय्या म्हणाले. (Kirit Somaiya)

मविआचं सरकार असताना बांगलादेशाच्या सीमेवर मोठं षडयंत्र
विधानसभा आचारसंहिता असताना व्होट जिहादअंतर्गत उबाठा (UBT) , एमआयएम (MIM) , काही मुस्लिम संस्था आणि बांगलादेशने मोठा गेमप्लॅन तयार केला होता. लोकसभेतील मोठ्या विजयानंतर राज्यात आपलेच सरकार येणार असा प्रचार त्यांच्याकडून केला जात होता. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार असताना बांगलादेशाच्या सीमेवरील एजंट यांनी मोठे षडयंत्र आखले. लोकसभेत यांचे अधिक खासदार निवडून आल्यानंतर आता त्यांचे सरकार येणार या विचाराने त्या चार-पाच महिन्याच्या काळात महाराष्ट्रात दोन लाख बांगलादेशी रोहिंग्यानी अर्ज केला होता. यापैकी १ लाख ७ हजारांना जन्म प्रमाणपत्र देण्यात आले, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. (Kirit Somaiya)

घुसखोरांना बांगलादेशला पाठवण्याची प्रक्रिया सुरू
किरीट सोमय्या यांनी जिल्ह्यानुसार जन्म प्रमाणपत्र वाटल्याची आकडेवारी दिली. ते म्हणाले, “यवतमाळला १३,५००, अमरावती व अकोल्याला प्रत्येकी १५०००, अकोला शहरात ४,५००, तर अंजनगाव सुर्जीमध्ये १४०० बांगलादेशी मुस्लिमांना जात प्रमाणपत्र देण्यात आले. आतापर्यंत राज्यभरात विविध ठिकाणी १ लाख ७ हजार बांगलादेशींना जन्म प्रमाणपत्र देण्यात आले आहे. ९० हजार अर्ज प्रलंबित आहेत. आपण मालेगावमध्ये गेलो होतो तेव्हा ही बाब पुढे आली. दोन लाख बांगलादेशींना भारतीय बनवण्याचे कारस्थान उघड झाले आहे. मालेगावचे नायब तहसीलदार यांना सस्पेंड करण्यात आले आहे. उशिराने जन्म प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया आता थांबवण्यात आली आहे आणि जन्म प्रमाणपत्र दिलेल्या एक लाख लोकांची चौकशी केली जाणार आहे. घुसखोरांना बांगलादेशला पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.” (Kirit Somaiya)

हे कटकारस्थान मालेगावमध्ये सुरू
बांगलादेशींचे दोन लाख हजार अर्ज जेथून आले आहेत, त्या ३७ तालुक्यात जाऊन आलो किंवा माहिती मिळवली. त्यात ९९% रोहिंग्या मुस्लिम आहेत. त्यांच्याकडे कोणताही पुरावा नाही आणि हे कटकारस्थान मालेगावमध्ये सुरू झाले आहे. मालेगावमध्ये झालेल्या बँक घोटाळ्यातून या कामासाठी पैसे आले आहेत, असा आरोपही सोमय्या यांनी केला आहे. (Kirit Somaiya)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.