Udhayanidhi Stalin : ड्रग्ज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे उदयनिधी स्टॅलिनपर्यंत

265
Udhayanidhi Stalin : ड्रग्ज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे उदयनिधी स्टॅलिनपर्यंत
Udhayanidhi Stalin : ड्रग्ज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे उदयनिधी स्टॅलिनपर्यंत

टॉलिवूड (Tollywood) आणि बॉलिवूड पुन्हा एकदा ड्रग सिंडिकेटशी जोडले गेले आहेत. NCB ने जफर सादिक (Jafar Sadiq) या तमिळ चित्रपट निर्मात्याला आंतरराष्ट्रीय ड्रग सिंडिकेट चालवल्याबद्दल अटक केली आहे. स्पेशल सेलच्या मदतीने सादिकला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. (Udhayanidhi Stalin)

जफर सादिकचे संबंध भारत-ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडच्या ड्रग्ज कार्टेलशी जोडलेले असल्याचे समोर आले. या ड्रग्ज व्यवसायातून मिळालेला पैसा तो फिल्म मेकिंग, रिअल इस्टेट, हॉटेल्स आणि इतर व्यवसायांत गुंतवत होता. गेल्या आठवड्यात या प्रकरणातील संबंधित तीन आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीत जफर सादिकची माहिती मिळाली. आता अमली पदार्थविरोधी पथकाने उदयनिधी स्टॅलिनचीही चौकशी करू शकते.

(हेही वाचा – Rajasthan : राजस्थानच्या 4 हजार पेट्रोलपंप मालकांचा संप; ‘ही’ आहे मागणी)

मंगाई हा चित्रपट ड्रग्जच्या पैशातून – एनसीबीचे डीडीजी ज्ञानेश्वर सिंह

जफर सादिकने चौकशीदरम्यान तमिळनाडूचे क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलिन यांना ७ लाख रुपये दिल्याची कबुली दिली आहे. ही रक्कम कोणत्या कारणासाठी देण्यात आली याचा तपास सुरू आहे. अमली पदार्थांतील पैसे स्टॅलिनला देण्यात आले होते का, याचाही तपास केला जात आहे. या तपासात कास्टिंग काउचचाही अँगल आहे. मनी लाँड्रिंगचा तपास करण्यासाठी एनसीबी आता ईडीला पत्र लिहित आहे. एनसीबी लवकरच काही बॉलीवूड फिल्म फायनान्सर्सना समन्स पाठवेल आणि त्यांना चौकशीसाठी बोलावेल. मंगाई हा चित्रपट पूर्णपणे ड्रग्जच्या पैशातून बनवण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे. उदयनिधी स्टॅलिन यांना दिलेल्या ७ लाख रुपयांपैकी २ लाख रुपये पक्ष निधीसाठी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तर पूर निधीसाठी ५ लाख रुपये देण्यात आले, असे एनसीबीचे डीडीजी ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितले.

५० किलो स्यूडोफेड्रिल औषध जप्त

एनसीबीच्या रडारवर आल्यानंतर जफर सादिक १५ फेब्रुवारीपासून फरार होता. या काळात तो त्रिवेंद्रम-मुंबई-पुणे-हैदराबाद-जयपूर येथे राहत असल्याचे समोर आले आहे. एनसीबीने त्याच्या ताब्यातून ५० किलो स्यूडोफेड्रिल औषध जप्त केले. तो खोबरे आणि सुक्या मेव्याच्या रुपात स्यूडोफेड्रिल न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाला पाठवत असे. सादिक द्रमुक पक्षाचा होता. आत्तापर्यंत जफर सादिकने ऑस्ट्रेलियाला ४५ पार्सल पाठवले आहेत. या औषधाच्या पुरवठ्यासाठी तो प्रतिकिलो एक लाख रुपये घेत असे.

जफर सादिकने आतापर्यंत ३५०० हजार किलो ड्रग्ज पाठवले आहेत, म्हणजेच त्याने सुमारे ४ हजार कोटी रुपयांचा पुरवठा केला आहे, असे अमली पदार्थ विरोधी पथकाने म्हटले आहे. २०१९ मध्ये ड्रग्ज तस्करी प्रकरणात त्याचे नाव मुंबई कस्टम्ससमोर त्याचे नाव आले होते. (Udhayanidhi Stalin)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.