Ulhasnagar: शासकीय निरीक्षणगृहातील लोखंडी खिडकीचे गज वाकवून अल्पवयीन मुली पसार

127

उल्हासनगर येथिल शहरातील शासकीय मुलीच्या निरीक्षणगृहातून (Government Girls’ Observation Home) मंगळवारी पहाटे ३ वाजता ८ मुली पळून गेल्याची घटना घडली. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात (Hillline Police Station) गुन्हा दाखल झाला असून पोलीस (Police) पथकाने कल्याण व विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन दरम्यान पळून गेलेल्या ८ पैकी ७ मुलीचा शोध घेतल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांनी दिली. (Ulhasnagar)

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, उल्हासनगर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी शासकीय निरीक्षण आणि विशेष गृह आहे. याठिकाणी विविध वयोगटातील मुलींना ठेवले जाते. या निरीक्षण गृहातील (Observation House) सेवासुविधा आवडत नसल्याने काही महिन्यांपासून राहत असलेल्या आठ मुलींनी निरीक्षण गृहातून गुपचूप पळून जाण्याचा निर्णय घेतला. या निरीक्षण गृहातून मुलींना बाहेर सोडले जात नाही. त्यांच्यावर कर्मचाऱ्यांची पाळत असते. त्यामुळे मंगळवारी सकाळी शय्यागृहात असताना आठ मुलींनी निरीक्षण गृहातील शय्या गृहातील खिडकीच्या लोखंडी जाळ्या तोडल्या. एका पाठोपाठ एक खिडकीतून उड्या मारून पळून गेल्या.

निरीक्षण गृहातील कर्मचारी फेरफटका मारण्यासाठी शय्यागृहात आला. त्यावेळी त्यांना शय्या गृहात एकही मुलगी नसल्याचे आणि खिडकीच्या लोखंडी जाळ्या तुटल्या असल्याचे दिसले. या मुली पळून गेल्याचा संशय व्यक्त करून निरीक्षण गृहातील अधिकाऱ्यांनी तातडीने हिललाईन पोलीस ठाण्याला माहिती दिली. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. 

(हेही वाचा – महात्मा फुले जन आरोग्य योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा; मंत्री Prakash Abitkar यांचे आवाहन)

महिला केअरटेकर, महिला पोलीस बंदोबस्त निरीक्षणगृहाला २४ तास असताना मुली पळून गेल्याची घटना घडल्याने, मुलीच्या निरीक्षणगृहाच्या एकूणच कारभारावर प्रश्नचिन्हे उपस्थित केले जात आहेत. तसेच फरार मुलीचा शोध पोलीस पथक घेत असून सापडलेल्या ७ मुली पुन्हा मुलीच्या निरीक्षणगृहात पोलीस बंदोबस्तात ठेवल्या आहेत. सर्व मुली उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड आदी ठिकाणच्या रहिवासी असून त्यांच्या घराचा पत्ता शोधण्याचे काम पोलीस करीत आहेत. पळून गेलेल्या मुलींना घरी जायचे होते. तसेच हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या चौकशीत मुलीना सुखसुविधा व जेवण नियमित तसेच चांगले दिले जात नाही म्हणून पळून गेल्याचे म्हटले.   

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.