अमरावती येथील फार्मासिस्ट उमेश कोल्हे यांची हत्या करणारे ११ आरोपी हे धर्मांध तबलिगी जमातचे असल्याचे राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) उघड केले आहे. आरोपींचे इरफान खान आणि मौलवी मुशफिक अहमद या दोन सामाजिक कार्यकर्त्यांनी ब्रेन वॉश केले होते. अमरावती येथील फार्मासिस्ट उमेश कोल्हे यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या ११ आरोपींविरुद्ध एनआयएने मुंबई एनआयए न्यायालयात आरोपपत्र दाखल केल्यानंतर काही दिवस झाले आहेत. आरोपपत्रात मुबशीर अहमद, शाहरुख खान, अब्दुल तौशीफ शेख, मोहम्मद शोएब, अतीब रशीद, युसूफ खान, इरफान खान, अब्दुल अरबाज, मुस्फीक अहमद, शेख शकील आणि शाहीम अहमद अशी आरोपींची नावे आहेत.
हत्येसाठी टोळी बनवली
भाजपच्या नेत्या नुपूर शर्मा यांनी केलेल्या तथाकथित वक्तव्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या असे सांगत देशभरात काही धर्मांध मुसलमानांनी धार्मिक भावना दुखावणाऱ्यांचे ‘सर तन से जुदा’ अर्थात त्यांचे शीर धडावेगळे करा, अशी घोषणा केली होती. त्यानुसार उमेश कोल्हे यांची दुसरी हत्या होती. कोल्हे यांना ठार करण्याच्या योजनेची सुरुवात आरोपी युसूफ खान याच्यापासून सुरू झाली. १४ जून रोजी पशुवैद्यकीय डॉक्टर कोल्हे यांनी ‘ब्लॅक फ्रीडम’ नावाच्या सोशल मीडिया ग्रुपवर पोस्ट टाकली होती. एनआयएच्या तपासानुसार, आरोपी युसूफने हेतुपुरस्सर डॉ. कोल्हे यांच्या पोस्टचे स्क्रीनशॉट घेतले. कोल्हे यांच्या हत्येची योजना त्यांचा स्क्रीनशॉट प्रसारित झाल्यापासून सुरू झाली, असे एनआयएने म्हटले आहे. 19 जून रोजी पोस्ट केल्यानंतर, मोहम्मद शोएब, अतीब रशीद, इरफान आणि शाहीम अहमद हे सर्व प्रमुख संशयित अमरावतीच्या गौसिया हॉलमध्ये जमले आणि कोल्हे यांना ठार मारण्याचा संकल्प केला, तर इरफानने त्यांना सर्व काही पुरवण्याचे आश्वासन दिले. या बैठकीत इरफानने आरोपींना मोबाईल फोन देऊ नयेत, काळे टी-शर्ट आणि ट्रॅक पँट घालण्याची आणि ओळख लपवण्यासाठी स्कार्फने तोंड झाकण्याची सक्ती केली होती. अशा प्रकारे, आरोपींनी उमेश कोल्हे यांना ठार मारण्यासाठी इरफानच्या नेतृत्वाखाली एक दहशतवादी टोळी तयार केली, त्यांनी नपूर शर्मा यांच्या विधानाचे समर्थन जे करतील, त्यांच्याविरोधात दहशत निर्माण केली होती, असे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
असा रचला कट
20 जून रोजी कोल्हे त्यांच्या मेडिकल दुकानात जात असताना आरोपी त्यांना संपवणार होते. कोल्हे त्यांना न दिसल्याने डावपेच अयशस्वी ठरले. यानंतर इरफानने आणखी एक रणनीती तयार केली आणि त्याचा कट अंमलात आणण्यासाठी कोल्हे यांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी एक युनिट तयार केली. 20 जूनच्या रात्री, या टोळीने शेख शकील, अब्दुल अरबाज मुदस्सीर अहमद, अब्दुल तौफीक शेख आणि अतीब यांच्यासह इतर आरोपींसोबत कोल्हे यांची हत्या करण्यासाठी मिटिंग घेतली. कोल्हे यांना शोधण्यासाठी टोळीने मोहम्मद शोएब आणि शाहीम अहमद यांना मदत केली. या दोघांनी कोल्हे त्यांची दुचाकी थांबवली आणि शोएबने कोल्हे यांच्यावर चाकूने हल्ला केला. चौकशीत असे दिसून आले की हत्येनंतर आरोपी पळून गेले आणि इरफानला भेटले, ज्याने गुन्ह्याच्या स्मरणार्थ पार्टी प्लॅन केली होती. तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, टोळीचा एक सदस्य अब्दुल अरबाज कोल्हे यांच्या मृत्यूची पुष्टी करण्यासाठी रुग्णालयात गेला आणि इरफानला सूचित केले, ज्याने नंतर मौलवीला कोल्हे यांच्या मृत्यूची माहिती दिली. कोल्हे यांच्या हत्येपूर्वी अमरावतीचे तीन नागरिक श्रीगोपाल चंदुलाल राठी, विशाल राजेश बहाड आणि जय कुमार आच्छाडा यांनाही या धर्मांध मुसलमानांनी नुपूर शर्माला पाठिंबा देत असल्या प्रकरणी धमकावले होते.आरोपपत्रानुसार, 11 आरोपींनी कट रचला, खुनाचे हत्यार मिळवले, फार्मासिस्टचा ठावठिकाणा शोधता यावा यासाठी त्यांची रणनीती आखली आणि नंतर पूर्वनियोजितपणे त्याची हत्या केली. एनआयएने आरोपपत्रात असेही नमूद केले आहे की 11 आरोपी इस्लामच्या धर्मांध विचारसरणीने अत्यंत प्रभावित होते आणि ते ‘गुस्ताख-ए-नबी की एक सजा, सर तन से जुदा’ यावर विश्वास ठेवत होते. या आरोपींवर बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायदा (UAPA) कलम 16, 18, आणि 20 आणि भारतीय दंड संहिता (IPC) कलम 34, 153 (A), 153 (B), 120 (B), आणि 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community