अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याचा उजवा हात म्हणून ओळखला जाणारा छोटा शकील याच्या विरुद्ध सुरू असलेल्या खटल्यात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) (NIA) फेब्रुवारी २०२२ मध्ये अटक केलेल्या छोटा शकीलचा मेहुणा आणि मुंबईतील वादग्रस्त व्यापारी आरिफ अबुबकर शेख ऊर्फ आरिफ भाईजान (६१) याचा शुक्रवारी सायंकाळी मुंबईतील जे.जे.रुग्णालयात मृत्यू झाला. आर्थर रोड तुरुंगात असलेल्या आरिफ भाईजान याला शुक्रवारी सायंकाळी श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्याला ७ वाजता जे.जे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
आरिफ भाईजान हा कुख्यात गुन्हेगार छोटा शकीलच्या बहिणीचा पती होता. मुंबईतील छोटा शकील याचे सर्व व्यवहार आरिफ भाईजान हाताळत होता तसेच दहशतवादी कृत्याला खतपाणी घालत असल्याचा आरोप आरिफ भाईजान याच्यावर होता. फेब्रुवारी २०२२मध्ये आरिफ भाईजान आणि त्याचा नातेवाईक शब्बीर अबुबकर शेख (५१) या दोघांना दहशतवादी कारवाया आणि दहशतवाद्याना आर्थिक पुरवठा केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. आरिफ भाईजान हा मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात होता, मार्च महिन्यात न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. दोन वर्षांपासून तुरुंगात असलेल्या आरिफ भाईजानला शुक्रवारी सायंकाळी अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला व छातीत दुखू लागल्यामुळे तुरुंग प्रशासनाने त्याला तात्काळ उपचारासाठी जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरू असताना ७:३० वाजता त्याचा मृत्यू झाला. आरिफ भाईजान हा मीरा रोड येथे राहात होता. तो कुख्यात डॉन छोटा शकील याचे मुंबईतील सर्व व्यवहार सांभाळत होता.
(हेही वाचा – Indian Army च्या पाइप बँड पथकाचे सामरिक धून वादन ऐकण्याची मुंबईकरांना संधी)
या प्रकरणात आरिफ भाईजानला झाली होती अटक
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद आणि त्याची टोळी शस्त्रास्त्रांची तस्करी, नार्को दहशतवाद, मनी लाँड्रिंग, बनावट नोटा प्रसारित करणे आणि अनधिकृत मालमत्ता बाळगणे यात गुंतली आहे, या बेकायदेशीर धंद्यातून येणारा पैसा दहशतवादी निधी उभारण्यासाठी आणि लष्कर-ए-तैयबा (एलईटी), जैश-ए-मोहम्मद (जेएम) आणि अल कायदा या दहशतवादी संघटनांना पुरवत असल्याच्या आरोपाखाली राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) तपास करीत असून या प्रकरणी दाऊद इब्राहिम, त्याचा उजवा हात समजला जाणारा छोटा शकील यांच्या विरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात फेब्रुवारी २०२२ मध्ये एनआयए ने मुंबईतून छोटा शकीलचे सर्व व्यवहार सांभाळणारा आरिफ अबूबकर शेख उर्फ आरिफ भाईजान आणि त्याचा नातलग शब्बीर यांना अटक करण्यात आली होती.
मीरा रोडमधील संपत्ती जप्त
एनआयए सोमवारी आरिफ भाईजान याचे मीरा रोड येथील गौरव ग्रीन रो हाऊस को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी मधील घर जप्त केले आहे. भाईजान याने ही संपत्ती बेकायदेशीररित्या कमावलेल्या पैशातून खरेदी केली असल्याची एनआयए ने प्रसिद्धी पत्रकात म्हटले होते.
उप्पा कायदा करण्यात आला दाखल
एनआयएने अटक केलेल्या ३ आरोपी आरिफ अबुबकर शेख उर्फ आरिफ भाईजान, शब्बीर अबुबकर शेख ऊर्फ शब्बीर टकला आणि मोहम्मद सलीम कुरेशी ऊर्फ सलिम फ्रूट आणि फरार आरोपी दाऊद इब्राहिम कासकर ऊर्फ शेख दाऊद, हसन शकील बाबू मोहिद्दीन शेख ऊर्फ छोटा शकील या दोघांविरुद्ध यापूर्वीच आरोपपत्र दाखल केले तसेच यांच्या विरुद्ध उप्पा आणि भारतीय दंड संहितेसंबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community