UP Crime News: गुपचूप तिसरं लग्न करत होता पती पण, अचानक दोघी मंडपात आल्या अन्…

318
UP Crime News: गुपचूप तिसरं लग्न करत होता पती पण, अचानक दोघी मंडपात आल्या अन्...
UP Crime News: गुपचूप तिसरं लग्न करत होता पती पण, अचानक दोघी मंडपात आल्या अन्...

एक व्यक्ती पहिल्या बायकोचा मृत्यू आणि दुसऱ्या बायकोसोबत घटस्फोट झाला असल्याचं सांगत तिसरं लग्न (UP Crime News) करण्याच्या तयारीत होता. मात्र, ऐनवेळी त्याच्या दोन्ही बायका लग्नाच्या मंडपात पोहोचल्या आणि एकच गोंधळ उडाला. बायको तिथे पोहोचल्याचं समजताच नवरदेव वरात घेऊन आलाच नाही आणि नवरी मात्र वाट बघतच राहिली. (UP Crime News)

वराला ताब्यात घेऊन चौकशी सुरू

अखेर पोलिसांनी घटनास्थळ गाठत हे लग्न थांबवलं. फसवणूक करणाऱ्या वराला ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यातून ही अजब घटना समोर आली आहे. समथर पोलीस स्टेशन हद्दीतील बसोवई गावातील रहिवासी विनय कुमार यांची मुलगी दीपा हिचं लग्न जालौन येथील रहिवासी जितेंद्र कुमार याच्याशी निश्चित झालं होतं. पाहुणे आणि नातेवाईक खात पीत असताना, विनीता आणि पूजा नावाच्या दोन महिला विवाह सोहळ्यात आल्या. त्यांनी त्या जितेंद्र या नवरदेवाच्या पहिल्या आणि दुसऱ्या पत्नी असल्याचे सांगितलं. हे ऐकून वधूच्या कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. (UP Crime News)

(हेही वाचा –KKR vs SRH Final: आयपीएलच्या अंतिम सामन्यापूर्वी चेन्नईत मुसळधार पाऊस, खेळाडूंची धावाधाव)

विनीताच्या म्हणण्यानुसार, 10 वर्षांपूर्वी जितेंद्रसोबत तिचा विवाह झाला होता. त्यांना दोन मुलीही आहेत. पूजाने सांगितलं की, जितेंद्रने तिला पहिली पत्नी विनीताच्या मृत्यूबद्दल सांगून तिच्याशी दुसरं लग्न केलं. त्यांना दोघांनाही एक मुलगी आहे. आता, दोघींची फसवणूक केल्यानंतर तो दीपाशी तिसरं लग्न करणार होता. सर्व माहिती घेऊन दोघीही तिथे आल्या. तिथल्या लोकांनी संपूर्ण प्रकार समजून घेण्याचा प्रयत्न केला. जीतेंद्र याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, त्याला तोपर्यंत सर्व काही समजलं होतं. वधूकडील लोकांच्या म्हणण्यानुसार, जितेंद्रने दीपाला पहिल्या पत्नीचा मृत्यू आणि दुसरीसोबत घटस्फोट झाल्याचं सांगून तिच्याशी संबंध प्रस्थापित केले होते. वाढता गोंधळ पाहून पोलिसांनी घटनास्थळ गाठून लग्न थांबवलं. (UP Crime News)

(हेही वाचा –FSSAI Mangoes Alert : जास्त आंबे खाताय तर थांबा… FSSAIने दिला इशारा)

पोलीस स्टेशन प्रभारी अजमेर सिंह भदौरिया यांनी सांगितलं की, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मात्र, लग्न थांबवण्यात आलं आहे. दोन्ही पत्नींना पोलीस ठाण्यात आणण्यात आलं आहे. मुलीच्या बाजूच्या लोकांनाही बोलावण्यात आलं आहे. तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. (UP Crime News)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.