उरण येथील 22 वर्षीय यशश्री शिंदे या तरुणीला लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवून तिची हत्या करणारा मुख्य आरोपी दाऊद शेख याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तो कर्नाटकमधील गुलबर्गा जिल्ह्यातील शाहपूर येथे असल्याचे पोलिसांना समजले होते. येथेच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. या अटकेनंतर उरणमधील तरुणीच्या हत्या प्रकरणातील तपशील समोर येण्याची शक्यता आहे. (Uran Love Jihad)
(हेही वाचा – Rohan Bopanna : पॅरिसमधील अपयशानंतर रोहन बोपान्नाची राष्ट्रीय टेनिसमधून निवृत्ती)
कर्नाटकमधून घेतले ताब्यात
उरण हत्याकांड समोर आल्यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी दाऊद फरार होता. पोलीस त्याचा कसून शोध घेत होते. पण पोलिसांना त्याचे नेमके ठिकाण समजत नव्हते. पण पोलिसांना शेवटी कर्नाटकमधून सकाळी सात वाजता त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. यापूर्वी या प्रकरणाशी निगडीत एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यात आरोपी दाऊद मृत तरुणीचा पाठलाग करत असल्याचे कैद झाले आहे. पोलिसांनी दाऊदला कर्नाटकमधील गुलबर्गा (Gulbarga) येथून ताब्यात घेण्यात आले आहे.
सीसीटीव्ही फुटेजमुळे झाला उलगडा
25 जुलै रोजीचे एकूण दोन सीसीटीव्ही समोर आले आहेत. यात आरोपी दाऊद शेख मृत तरुणीचा पाठलाग करत असल्याचे समोर आले आहे. मृत तरुणीचा मृतदेह उरणच्या खाडीत सापडला होता. मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे नोंदवली होती. पोलिसांनी उरणमध्ये मिळालेल्या मृतदेहाची तपासणी केली आणि मृत तरुणीची ओळख पटवण्यात आली. त्यानंतर हे हत्या प्रकरण समोर आले होते.
कर्नाटकमधून केरळला जाणार होता
दाऊदला पकडण्यासाठी पोलिसांनी एकूण सहा ते सात पथकं तैनात केली होती. ही पथकं दाऊचा संपूर्ण महाराष्ट्रात शोध घेत होते. दाऊदच्या संपर्कातील एका व्यक्तीच्या माहितीनुसार दाऊद सध्या कर्नाटकमध्ये असल्याचे पोलिसांना समजले होते. तो कर्नाटकहून (Karnataka) केरळमध्ये जात असल्याचे पोलिसांना समजले होतं. त्यानंतर नवी मुंबईचे पोलीस पथक थेट कर्नाटकात दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी गुलबर्गा येथून अटक करण्यात आले आहे.
दरम्यान, दाऊद शेख याला गुलबर्गा येथून बाय रोड किंवा हवाईमार्गे घेऊन यायचे याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. संध्याकाळपर्यंत आरोपी दाऊद नवी मुंबईत असेल. (Uran Love Jihad)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community