काही दिवसांपूर्वी नवी मुंबई उरण (Navi Mumbai Uran) येथे यशश्री शिंदे (Yashshree Shinde) या २० वर्षीय तरुणीचा निर्घृण हत्या करण्यात आली. दाऊद शेख (Accused Dawood Shaikh) या आरोपीने यशश्री शिंदे हिची हत्या केली. या घटनेने राज्यात खळबळ उडाली होती. दरम्यान उरण मधील जासई येथे शनिवारी (१७ ऑगस्ट) सकाळी एका गोणीत मृतदेह सापडल्यानंतर उरण पोलिसांनी तीन तासांतच खुनाचा छडा लावला आहे. दत्तात्रय दुतुकडे (Dattatraya Dutukade) (४०) असे मृताचे नाव असून, ते उरण येथील एका ट्रान्सपोर्ट कंपनीत चालक म्हणून काम करत होते. (Uran Murder Case)
(हेही वाचा – डॉक्टरांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर CM Eknath Shinde यांची केंद्रीय आरोग्य मंत्र्यांशी चर्चा)
पांढऱ्या रंगाची गोणी गावातील एका वाटसरूच्या लक्षात आली आणि त्यांनी पोलिसांना संबंधित माहिती दिली. “आम्हाला घटनेची माहिती मिळाल्यानंतर आम्ही फॉरेन्सिक टीमसह घटनास्थळी पोहोचलो आणि पंचनामा केला. तपासादरम्यान, दुतुकडेचे परिसरातील एका महिलेशी प्रेमसंबंध असल्याचे आम्हाला समजले आणि आम्ही तपास सुरू केला, अशी माहिती उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांनी दिली.
आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासात असताना, पोलिसांना एक जोडपे पोत्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे व्हिडिओ फुटेजमध्ये आढळले. बालगंधर्व रामचंद्र गोराड (42) आणि त्यांची पत्नी चांगुणा (32, जासई) अशी संबंधित आरोपींची नावे आहेत. हा खून अनैतिक संबंधातून झाला आहे. मृत दत्तात्रय दुतुकडे यांचे ज्या महिलेसोबत प्रेमसंबंध होते, तिच्या पतीनेच हत्येचा कट रचला होता, असे सहायक पोलिस आयुक्त (बंदर) विशाल नेहुल यांनी सांगितले. हे जोडपे पनवेल राज्य परिवहन बसस्थानकाजवळ सापडले असून त्यांना अटक करण्यात आले. (Uran Murder Case)
(हेही वाचा – सहानुभूतीतून मिळालेली लोकप्रियता फार काळ टिकत नाही; रत्नाकर महाजनांचा Uddhav Thackeray यांना टोला)
इशारा ऐकला नाही अन्…
गोराड दाम्पत्य आणि मृत दुतुकडे हे मूळचे साताऱ्याचे असून ते एकमेकांच्या परिचयाचे असून ते उरण येथे चालक म्हणून काम करत होते. गोराड यांची मुले साताऱ्यात राहतात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोराडची पत्नी दुतुकडे यांचे प्रेमसंबंबद्ध होते आणि तिचा पती दुतुकडे हे संबंध बंद करण्याचा इशारा देत होता. दुतुकडे यांनी त्यांचा इशारा न ऐकल्याने गोराडने त्यांना ठार मारण्याचा निर्णय घेतला आणि शुक्रवारी रात्री जेवायला बोलावून दारू पाजली. दारूच्या नशेत तो झोपी गेल्यानंतर गोराडने घरातील कपडे धुण्यासाठी वापरण्यात येणारा दगड घेतला आणि त्याच्या डोक्यात घातला. त्यानंतर दाम्पत्याने मृतदेह गोणीत टाकून फेकून दिला. (Uran Murder Case)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community