अमेरिकन न्यायालयाने दहशतवादी Tahawwur Rana ची प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याची याचिका फेटाळली

70
अमेरिकन न्यायालयाने दहशतवादी Tahawwur Rana ची प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याची याचिका फेटाळली
अमेरिकन न्यायालयाने दहशतवादी Tahawwur Rana ची प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याची याचिका फेटाळली

मुंबई दहशतवादी हल्ल्याचा (Mumbai terrorist attack) मास्टरमाईंड तहव्वूर राणाचा (Tahawwur Rana) भारतात प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा राणाची याचिका फेटाळली आहे. राणाने सर्वोच्च न्यायालयात (Supreme court) आपातकालीन याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली.

( हेही वाचा : राज्यातील आदिम जमातींसाठी Mahayuti सरकारचे विशेष प्रयत्न

मिळालेल्या माहितीनुसार, दि. ७ मार्च रोजी (भारतीय वेळेनुसार) अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने दहशतवादी तहव्वुर राणा (Tahawwur Rana) याचे भारतात प्रत्यार्पण थांबवण्यासाठी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली आहे. मुंबई दहशतवादी हल्ल्यातील (Mumbai terrorist attack) आरोपी तहव्वुर राणा यांनी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे असोसिएट जस्टिस आणि नवव्या सर्किटच्या सर्किट जस्टिससमोर भारतात त्याचे प्रत्यार्पण थांबवण्यासाठी आपत्कालीन याचिका दाखल केली होती. ही याचिका अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या असोसिएट जस्टिस एलेना कागन यांच्यासमोर सादर करण्यात आलेली याचिका कागन यांनी याचिका फेटाळली.

मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणा (Tahawwur Rana) अमेरिकेतील लॉस एंजेलिसमधील ‘मेट्रोपॉलिटन डिटेंशन सेंटर’मध्ये आहे. राणाने अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत दावा केला आहे की, तो पाकिस्तानी वंशाचा मुस्लिम असल्याने भारतात त्याचा छळ केला जाईल. त्याने छळ होण्याच्या धोक्याबद्दल सांगितले होते. तहव्वुर राणा हा ६४ वर्षांचा आहे आणि त्याची ओळख पाकिस्तानी (Pakistani)-अमेरिकन दहशतवादी म्हणून झाली आहे.

राणा हा मुंबई हल्ल्यातील मुख्य सूत्रधारांपैकी एक असलेल्या डेव्हिड कोलमन हेडलीचा (David Headley) जवळचा सहकारी देखील आहे.दरम्यान, काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी तहव्वूर राणाला भारताकडे सोपवले जाणार असल्याची माहिती दिली होती. ‘आमच्या प्रशासनाने 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या दोषी तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणास मंजुरी दिली आहे. आता तो भारतात जाऊन न्यायाला सामोरे जाईल.’, असे ट्रम्प त्यावेळी म्हणाले होते.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.