अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय ; मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी Tahawwur Rana चे भारतात प्रत्यार्पण करण्यास मंजुरी

52
अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय ; मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी Tahawwur Rana चे भारतात प्रत्यार्पण करण्यास मंजुरी
अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय ; मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी Tahawwur Rana चे भारतात प्रत्यार्पण करण्यास मंजुरी

मुंबईकरांच्या मनात आजही कशाची भिती असेल तर ती 2008 साली 26/11 चा झालेला भीषण हल्ला (Mumbai terror attack). पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी मुंबईत घुसून ताज हॉटेलसह (Taj Hotel) अन्यत्र अंदाधुंद गोळीबार केला होता. आजही या हल्ल्याचे सूत्रधार पाकिस्तानात मोकाट फिरत आहेत. तिथे आरामात आयुष्य जगत आहेत. याच हल्ल्यातील एक आरोपी तहव्वुर राणा (Tahawwur Rana) अमेरिकन तुरुंगात बंद आहेत. अमेरिकन सुप्रीम कोर्टाने (US Supreme Court) त्याच्या प्रत्यर्पणाला मंजुरी दिली आहे.

भारताची बऱ्याच काळापासून मागणी
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या प्रकरणात राणाचा ताबा हवा असल्याने पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन नागरिक राणाचे प्रत्यार्पण करण्याची भारताची बऱ्याच काळापासून मागणी होती. कनिष्ठ न्यायालयांमध्ये कायदेशीर लढाई हरल्यानंतर राणाने भारतात प्रत्यार्पणाविरुद्ध अमेरिकन सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर काही आठवड्यांनंतर प्रत्यार्पणास मंजुरी मिळाली आहे. कनिष्ठ न्यायालये आणि अनेक संघीय न्यायालयांमध्ये कायदेशीर लढाई हरल्यानंतर राणाने शेवटचा सॅन फ्रान्सिस्कोमधील यूएस कोर्ट ऑफ अपील फॉर द नॉर्थ सर्किटमध्ये धाव घेतली होती. (Tahawwur Rana)

हल्ल्यावेळी कंट्रोल रुममध्ये बसलेला माणूस तहव्वुर राणाच
डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रपती झाल्यानंतर लगेच याबाबत निर्णय झाला. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत तहव्वुर राणाच्या प्रत्यर्पणाला मंजुरी दिली. तहव्वुर राणाला आता भारतात आणलं जाईल. त्याच्यावर इथे खटला चालेल. 26/11 हल्ल्यातील त्याचा रोल काय? कारस्थान कसं रचलं? या सगळ्याची चौकशी होईल. तहव्वुर राणावर आरोप आहे की, त्याने 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड डेविड कोलमॅन हेडलीची मदत केली होती. हेडलीच्या इशाऱ्यावर तो संपूर्ण कट अमलात आणत होता. राणा डेविड हेडलीचा राइटहॅण्ड होता. कंट्रोल रुममध्ये जो माणूस बसलेला तो तहव्वुर राणाच होता असं म्हटलं जातं. मुंबई हल्ल्यातील दोषी राणा भारतात आल्यानंतर तपास यंत्रणांना 26/11 हल्ल्याच्या कारस्थानाबाबत बरीच माहिती मिळू शकते. कोणाची काय भूमिका होती? कोण-कोण या कटात सहभागी होते, ते स्पष्ट होईल. अनेक नावं अजून समोर आलेली नाहीत, तहव्वुर राणाच्या चौकशीतून ती माहिती मिळू शकते. (Tahawwur Rana)

भारताला प्रत्यार्पण न करण्याची राणाची ही शेवटची कायदेशीर संधी
मुंबई पोलिसांच्या आरोपपत्रानुसार राणा दहशतवाद्यांना हल्ल्याचे ठिकाण आणि भारतात आल्यानंतर राहण्याची ठिकाणे सांगून मदत करत होता. राणानेच ब्लू प्रिंट तयार केली होती, ज्याच्या आधारे दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता. राणा आणि हेडलीवर दहशतवादी कट रचल्याचा आरोप होता. मुंबई हल्ल्याचा कट रचण्यात राणाचा मोठा हात होता, असे आरोपपत्रात म्हटले आहे. भारताला प्रत्यार्पण न करण्याची राणाची ही शेवटची कायदेशीर संधी होती. 16 डिसेंबर रोजी, यूएस सॉलिसिटर जनरल एलिझाबेथ बी प्रीलॉगर यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका फेटाळण्याची विनंती केली. राणाचे वकील जोशुआ एल ड्रेटेल यांनी 23 डिसेंबर रोजी त्याच्या उत्तरात अमेरिकन सरकारच्या शिफारशीला आव्हान दिले आणि सर्वोच्च न्यायालयात त्याची रिट स्वीकारण्याची विनंती केली होती. (Tahawwur Rana)

राणा हा पाकिस्तानी ISI आणि लष्कर-ए-तैयबाचा ऑपरेटिव
भारताने अमेरिकन कोर्टात मजबूत पुरावे सादर केले. यात राणाचा सहभाग स्पष्ट झाला. राणाला 2009 साली शिकागो येथून अटक करण्यात आली होती. FBI ने त्याला अरेस्ट केली होती. तहव्वूर हा या हल्ल्याचा मास्टरमाईंड डेव्हिड हेडलीचा बालपणीचा मित्र होता. राणा हा पाकिस्तानी ISI आणि लष्कर-ए-तैयबाचा ऑपरेटिव आहे. हेडलीला मदत करून आणि त्याला आर्थिक मदत देऊन तहव्वूर दहशतवादी संघटना आणि त्याच्यासह दहशतवाद्यांना पाठिंबा देत होता. हेडली कोणाला भेटत होता, काय बोलतोय याची माहिती राणाकडे होती. त्याला हल्ल्याचे नियोजन आणि काही लक्ष्यांची नावेही माहीत होती. राणा हा या संपूर्ण कटाचा एक भाग होता आणि त्याने दहशतवादी हल्ल्यासाठी निधी पुरवल्याचा गुन्हा केल्याचा पूर्ण संशय आहे, असे अमेरिकन सरकारने म्हटले आहे. (Tahawwur Rana)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.