बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा खून केल्याप्रकरणी सध्या वाल्मिक कराड आणि त्याचे साथीदार बीड कारागृहात (Jail) बंदिस्त आहेत. त्यांना कारागृहात मारहाण झाल्याची घटना घडली. आमदार सुरेश धस यांनी ही माहिती देताना बीड कारागृहात गँगवॉर सुरु असल्याचा त्यांचा आरोप आहे.
वाल्मीक कराड याच्यासह सुदर्शन घुलेला मारहाण झाल्याचा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. जुन्या रागातून बबन गित्ते याचा सहकारी असलेल्या महादेव गित्ते याने Jail मध्ये ही मारहाण केल्याचे म्हटले आहे. परळीतील सरपंच बापू आंधळे यांच्या खून प्रकरणात वाल्मीक कराडने आम्हाला विनाकारण गुंतवून आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले, असा बबन गित्ते आणि महादेव गित्ते यांचा दावा आहे. याच रागातून महादेव गित्ते याने आता तुरुंगात (Jail) वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण केल्याचे माहिती आहे.
(हेही वाचा Bihar मध्ये धर्मांध मुसलमानांकडून हिंदूंच्या चैत्र नवरात्रीच्या शोभायात्रेवर दगडफेक)
दरम्यान, जोपर्यंत बबन गित्तेला संपवत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही, अशी शपथ वाल्मीक कराडने घेतली होती आणि जोपर्यंत कराडचा खून करत नाही तोपर्यंत दाढी काढणार नाही, असा निश्चय बबन गित्तेने केला होता, असे त्यांच्या जवळचे लोक सांगतात, असेही सुरेश धस यांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community