Valmik Karad : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सध्या तुरूंगात असलेल्या वाल्मिक कराडचे नवनवे कारनामे समोर येत आहेत. वाल्मीक कराडचे सिनेसृष्टीशी खास कनेक्शन असल्याचे उघड झाले आहे. वाल्मीक कराड फिल्म प्रोड्यूसर होता. त्याचे आयडी कार्ड सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. (Valmik Karad)
(हेही वाचा – Jasprit Bumrah : मुंबई इंडियन्ससाठी खुशखबर, जसप्रीत बुमराह क्रिकेट अकादमीत करतोय गोलंदाजी)
संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराडचे नवनवीन कारनामे गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहेत. अशामध्ये आता वाल्मीक कराड चित्रपट निर्माता (Valmik Karad Film Producer) असल्याची माहिती समोर आली आहे. वाल्मीक कराडकडे इंडियन मोशन पिक्चर प्रोड्यूसर असोसिएशनचे (Indian Motion Picture Producers Association) आयडी कार्ड असून त्याचा फोटो व्हायरल झाला आहे. बी आर जे फिल्म प्रोडक्शन या निर्मीती संस्थेचा तो सभासद असल्याचे सांगितले जात आहे. या प्रोडक्शन हाऊसचा तो आजीवन सभासद असल्याचे म्हटले जात आहे.
(हेही वाचा – IPL 2025, Ashwini Kumar : पदार्पणात ४ बळी घेणारा मुंबईचा अश्विनी कुमार कोण आहे?)
वाल्मीक कराड यांच्या बीकेसीमधील याच फिल्म प्रोडक्शनच्या ऑफिसचे फोटो देखील समोर आले आहेत. हे वाल्मीक कराडचे ऑफिस असल्याचे सांगितले जात आहे. हे वाल्मीक कराडचे ऑफिस असल्याचा दावा निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले (Suspended police officer Ranjit Kasle) यांनी केला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community