Pune Crime: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकाची भरचौकात गोळ्या झाडून हत्या!

160
Pune Crime: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकाची भरचौकात गोळ्या झाडून हत्या!
Pune Crime: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकाची भरचौकात गोळ्या झाडून हत्या!

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी पुण्याचे (Pune Crime) राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर (Vanraj Andekar) यांची रविवारी (1 सप्टेंबर) रात्री काही अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. शहरातील नाना पेठ परिसरात माजी नगरसेवकाची हत्या करण्यात आली. या घटनेने पुणे शहर हादरलं आहे.

(हेही वाचा-Burj Khalifa बांधणाऱ्या बिल्डरवर EDची कारवाई)

एका खासगी रुग्णालयामध्ये वनराज यांच्यावर उपचार सुरु होते. वनराज यांच्या मृत्यूच्या बातमीला पुण्याचे सह-पोलीस आयुक्त राजन कुमार शर्मा यांनी दुजोरा दिला आहे. गोळीबार केल्यानंतर वनराज यांच्यावर कोयत्याने वार करण्यात आले. कोयत्याने वार केल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. (Pune Crime)

याविषयी सविस्तर माहिती पोलिसांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. “आज रात्री साडेनऊच्या सुमारास वनराज आंदेकर हे त्यांच्या चुलत भावाबरोबर इनामदार चौकात उभे होते. त्यावेळे काही लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये एकूण 5 गोळ्या झाडण्यात आल्या. घटनास्थळावरील प्राथमिक पहाणीनुसार या दोघांवर धारधार शस्त्रांनीही हल्ला करण्यात आला,” असं सह-पोलीस आयुक्त शर्मा यांनी सांगितलं. (Pune Crime)

(हेही वाचा-UPSC Exam 2022 च्या निकालासंदर्भात दिशाभूल करणारी जाहिरात करणाऱ्या अकादमीला ५ लाखांचा दंड)

या प्रकरणी तीन ते चार संशयितांची नावे पोलिसांच्या हाती लागली आहेत. नाना पेठेतील डोके तालीम परिसरात आंदेकर उभे असताना हल्लेखोरांनी पिस्तुलातून पाच ते सहा गोळ्या त्यांच्यावर झाडल्या. त्यानंतर या दोघांवर कोयत्याने हल्ला केला. गोळीबाराच्या घटनेपूर्वी डोके तालीम परिसरातील लाईट घालवले. घरातील कार्यक्रम असल्यामुळे आंदेकर यांच्यासोबत इतर सहकारी नव्हते. नेमकी हीच संधी साधून दुचाकीवरून आलेल्या तीन ते चार जणांनी आधी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर कोयत्यानं वार केले. (Pune Crime)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.