Vasai Murder Case: “पैसे दे, मामला रफादफा करतो”, वसई पोलिसांनी मागितले आरोपीकडे पैसे, आरतीच्या बहिणीचा पोलिसांवर गंभीर आरोप

219
Vasai Murder Case : पोलिसांत तक्रार दिल्याच्या रागातून घडले वसईतील हत्याकांड; ८ दिवसांपासून हल्लेखोर होता आरतीच्या मागावर

वसईच्या (Vasai Murder Case) गौराईपाडा येथे मंगळवारी रोहित रामनिवास यादव (वय 29) (Rohit Ramniwas Yadav) या तरुणाने भररस्त्यात आरती रामदुलार यादव (वय 22) (Aarti Ramdular Yadav) हिची निर्घृणपणे हत्या (Vasai Girl Murder) केली. रोहितने लोखंडी पान्याने आरतीवर तब्बल 15 वेळा घाव घातले. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला होता. सकाळी साडेनऊनच्या सुमारास ही घटना घडली तेव्हा रस्त्यावर अनेकजण होते. मात्र, यापैकी कोणीही आरतीच्या मदतीला धावून गेले नाही. या सगळ्या घटनेविषयी संताप आणि चीड व्यक्त होत असतानाच आता आरती यादव हिच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. (Vasai Murder Case)

“… त्यामुळे मला वाटलं हा विषय संपला, पण”

‘एबीपी माझा’शी बोलताना आरती यादवची आई ओक्साबोक्शी रडत होती. तिने म्हटले की, “मुझे जान के बदले जान चाहिए, तरच आरतीला न्याय मिळेल. जीव घेतल्याशिवाय आरतीला न्याय मिळणार नाही.” असे आरतीच्या आईने म्हटले. आरतीच्या वडिलांनी सांगितले की, ‘मी रोहित यादवला सांगितले होते की, तू स्वत:ची रुम घे. मी मुलीचं तुझ्याशी लग्न लावून देतो. तुझ्याकडे काही असल्याशिवाय मी तुझं लग्न लावून देणार नाही. त्यासाठी मी त्याला रुम घ्यायला सांगत होतो. पण रोहित म्हणाला की, माझी ऐपत नाही, मी रुम विकत घेऊ शकणार नाही. नंतर तो म्हणाला, मी माझं बघतो, तुम्ही तुमचं बघा. त्यामुळे मला वाटलं हा विषय संपला. पण त्यानंतर 8 जूनला रोहितने आरतीला मारहाण केली. आम्ही पोलीस चौकीत तक्रार घेऊन गेलो तर पोलीस म्हणाले की, काही होणार नाही.’ असे आरतीच्या वडिलांनी सांगितले. (Vasai Murder Case)

“मी पोलीस स्टेशनमध्ये येऊन तो कोण पोलीस अधिकारी होता, हे तुम्हाला दाखवेन” 

यावेळी आरती यादवच्या बहिणीने पोलिसांवर गंभीर आरोप केला. ती म्हणाली, “8 जूनला आरतीला रोहितने मारहाण केल्यानंतर आम्ही पोलीस चौकीत गेलो होतो. तेव्हा तेथील एक पोलीस अधिकारी रोहितला मराठीत बोलला, ‘चल पैसे दे, मामला रफादफा करतो’. पोलिसांनी त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. मी पोलीस स्टेशनमध्ये येऊन तो कोण पोलीस अधिकारी होता, हे तुम्हाला दाखवेन.” असे आरतीच्या बहिणीने म्हटले. आरती यादवच्या बहिणीने पोलिसांवर केलेल्या या गंभीर आरोपामुळे एकच खळबळ उडाली होती. रोहित यादवकडून पैसे मागणारा अधिकारी कोण होता? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. रोहित यादवला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. जान के बदले जान चाहिए, तेव्हाच शांती मिळेल, असे सानिया यादव हिने म्हटले. (Vasai Murder Case)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.