Vasai Murder ने करुन दिली रिंकू पाटील हत्याकांडाची आठवण; मुंबई ठाण्यात खळबळ उडवून देणाऱ्या तीन हत्या

271
Vasai Murder ने करुन दिली रिंकू पाटील हत्याकांडाची आठवण; मुंबई ठाण्यात खळबळ उडवून देणाऱ्या तीन हत्या

वसई येथे भररस्त्यात घडलेल्या हत्याकांडाने रिंकू पाटील, प्रीती राठी आणि लालबागमधील एकता तळवलकर या तरुणीच्या हत्याकांडाची आठवण करून दिली. मंगळवारी वसई येथे आरती यादव या वीस वर्षीय तरुणीची भररस्त्यात सर्वांसमोर तिच्या प्रियकराने क्रूररित्या हत्या केली, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. अनेक जणांनी उल्हासनगरची रिंकू पाटील, राजस्थानमधील प्रीती राठी आणि लालबागच्या एकता तळवलकर हत्याकांडाची आठवण करून दिली आहे. (Vasai Murder)

रिंकू पाटीलला भरवर्गात पेटवले

उल्हासनगर येथे राहणारी १६ वर्षांच्या रिंकू पाटील या विद्यार्थीनीला एकतर्फी प्रेमातून ३० मार्च १९९० मध्ये भरवर्गात रिंकूच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवण्यात आले होते. या घटनेनंतर माथेफिरू तरुणाने आत्महत्या केली होती. ३४ वर्षापूर्वी घडलेल्या या घटनेने महाराष्ट्र हादरला होता. रिंकू पाटील ही दहावीची विद्यार्थी होती, हरेश पटेल हा तिच्यावर एकतर्फी प्रेम करीत होता. मात्र रिंकूचा या प्रेमाला विरोध होता. रिंकूच्या विरोधामुळे हरेश पटेलने रिंकूला संपविण्याचा कट रचला. (Vasai Murder)

(हेही वाचा – Vasai Murder Case: “पैसे दे, मामला रफादफा करतो”, वसई पोलिसांनी मागितले आरोपीकडे पैसे, आरतीच्या बहिणीचा पोलिसांवर गंभीर आरोप)

३० मार्च १९९० रोजी रिंकूची दहावी बोर्डाची परीक्षा होती. रिंकू परीक्षा केंद्रात येऊन बसलेली असताना हरेश पटेल हा आपल्या तीन मित्रांसह वर्गात घुसला. हरेशच्या हातात पेट्रोलचा कॅन होता, व इतरांच्या हातात धारदार शस्त्रे होती. हरेश आणि त्याच्या मित्रांनी परीक्षा केंद्रावर बंदोबस्तकामी असलेल्या पोलिसांना न जुमानता परीक्षा केंद्रात प्रवेश केला. त्यानंतर रिंकू बसलेल्या वर्गात शिरून त्याने इतर विद्यार्थ्यांना एका बाजूला केले व काही कळण्याच्या आत हरेशने सोबत आणलेला पेट्रोल कॅन रिंकूवर रिकामा करून तिला पेटवून दिले. भरवर्गात रिंकू सर्वांसमोर पेटत होती, परंतु तिच्या बचावासाठी पुढे येण्याचे कोणीच धाडस करीत नव्हते, या जाळपोळीत रिंकूचा वर्गातच मृत्यू झाला. या घटनेनंतर हरेश आणि त्याच्या मित्रांनी तेथून पळ काढला, आणि थेट रेल्वे समोर स्वतःला झोकावून देत हरेशने आत्महत्या केली. पोलिसांनी या प्रकरणात हरेश पटेलच्या दोन्ही मित्रांना अटक केली होती. त्या दोघांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. ३४ वर्षांपूर्वी रिंकू पाटील प्रकरण संपूर्ण देशात गाजले होते. (Vasai Murder)

(हेही वाचा – Vasai Murder Case : पोलिसांत तक्रार दिल्याच्या रागातून घडले वसईतील हत्याकांड; ८ दिवसांपासून हल्लेखोर होता आरतीच्या मागावर)

काळाचौकी येथील एकताला रस्त्यातच संपवले

मुंबईतील लालबाग येथे ११ वर्षांपूर्वी घडलेल्या एकता तळवलकर या २५ वर्षीय तरुणीच्या हत्याकांडाने मुंबई हादरली होती. लालबाग परिसरातील देनू कंपाऊंड येथे राहणारा प्रसाद सावंत (२७) याने २०१५ मध्ये काळाचौकी ग. द. आंबेकर रोड येथे प्रेयसी एकताला बोलावून सोबत आणलेल्या तीक्ष्ण हत्याराने भररस्त्यात तिचा गळा चिरून हत्या केली. त्यानंतर स्वतः काळाचौकी पोलीस ठाण्यात हजर होऊन गुन्ह्याची कबुली दिली होती. आरोपी प्रसाद आणि एकता यांच्यात ११ वर्षे मैत्रीचे संबंध होते. परंतु तिने लग्नाला नकार दिल्यामुळे प्रसादने दारूच्या नशेत एकताची हत्या केली होती. या हत्याकांडाने मुंबईत खळबळ उडवून दिली होती. (Vasai Murder)

प्रीती राठी ऍसिड हल्ला

मुंबईतील वांद्रे टर्मिनस परिसरात मे २०१३ मध्ये झालेल्या ऍसिड हल्ल्याने मुंबईला हादरवून सोडले होते. कुलाबा ‘आयएनएस’ येथे परिचारिका म्हणून नोकरीसाठी मुंबईत आलेली २३ वर्षाची प्रीती राठी या तरुणीवर वांद्रे रेल्वे टर्मिनसवर ऍसिड हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यानंतर तिच्यावर मसीना रुग्णालयात उपचार सुरू असताना १ जून रोजी तिचा मृत्यू झाला. (Vasai Murder)

प्रीती राठी, तिचे वडील आणि इतर दोन नातेवाईक २ मे २०१३ रोजी मुंबईच्या वांद्रे टर्मिनस येथे गरीब रथ एक्स्प्रेसमधून उतरले. प्रीतीची कुलाबा येथील INS अश्विनी येथे दुय्यम लेफ्टनंट (नर्सिंग) म्हणून निवड झाली. त्याच्या जॉईनसाठी सर्वजण मुंबईत पोहोचले होते. प्रीती स्टेशनवर उतरताच रुमालाने चेहरा झाकलेल्या एका व्यक्तीने तिच्यावर ॲसिड फेकले आणि तेथून पळ काढला. प्रीती राठीवर भररस्त्यात झालेल्या ऍसिड हल्ल्याचे प्रकरण देशभरात गाजले होते. याप्रकरणी तिच्याच गावातील अंकुर पनवार याला अटक करण्यात आली होती, २०१६ मध्ये अंकुरला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. प्रीती आणि अंकुर यांनी एकत्र शिक्षण घेतले होते. प्रीतीला नोंदलात नोकरी लागली होती, अंकुर मात्र बेरोजगार होता. प्रीतीच्या नोकरी वरून अंकुरचे कुटूंब त्याला सतत टोमणे मारायचे या रागातून त्याने हे कृत्य केले होते. (Vasai Murder)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.