उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना एका तरुणाने जीवे मारण्याची धमकी देणारी पोस्ट इन्स्टाग्रामवर टाकली आहे. सध्या हा तरूणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक तरुण शिंदे (Eknath Shinde) यांना शिवीगाळ करत आहे. हितेश धेंडे (Hitesh Dhende) असे धमकी देणाऱ्या तरुणाचे नाव असल्याची माहिती आहे. हा तरुण सध्या ठाणे (Thane) शहरातील श्रीनगर भागातील वरळीपाडा येथे राहत असून त्याचे वय २४ वर्षे असल्याची माहिती आहे.
ठाणे –
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी देणारा व्हिडिओ व्हायरल
हितेश धेंडे असे धमकी देणाऱ्या तरुणाचे
पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झाला
पोलिसांकडून तरुणाचा शोध सुरू #EknathShinde #ठाणे #Thane #Police #Maharashtra #महाराष्ट्र pic.twitter.com/jHHgZ7NgAb
— Milind Sagare (@MilindSagare1) January 5, 2025
याप्रकरणी ठाण्याच्या श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या तरुणाचा शोध घेत आहेत. तरुणावर गुन्हा दाखल करण्यासाठी शिवसैनिक मोठ्या संख्येने पोलीस ठाण्याबाहेर जमले होते. या तरुणाला अटक करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत शिवसेना कार्यकर्त्यांनी पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर पोलिसांनी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. (Eknath Shinde)
हेही वाचा-Pollution नियंत्रणाचे नाटक नको, सातत्य हवंय!
याबाबत शिवसेनेच्या ठाण्यातील एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, “धेंडे याने एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी दिली. असभ्य पोस्ट टाकली. त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहे.” हितेश धेंडेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी शिवसैनिकांनी श्रीनगर पोलीस स्टेशनबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने तक्रार दाखल केली. त्याच्याविरुद्ध श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या तरुणाचा शोध घेत आहेत. (Eknath Shinde)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community