पावसाळा सुरु असल्याने पर्यटनस्थळी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. दरम्यान अशाच वेळी अनेक पर्यटक धोकादायक ठिकाणी आपला जीव धोक्यात घालून सेल्फी घेण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतायत. साताऱ्यातील (satara) बोरने घाटात असाच प्रकार घडला. पुण्यातील एका युवतीने डोंगराच्या किनाऱ्यावर सेल्फी काढण्याचे धाडस केले अन् ती शंभर फूट खोल दरीबोरने घाटात (Borne Ghat) कोसळली.
नसरीन सेल्फी घेत असताना अचानक…
पुण्यातील वारजे येथील नसरीन अमीर कुरेशी (वय २९) आणि काही जण साताऱ्यातील संगमनगरमध्ये कारने आले होते. या सर्वांनी ठोसेघर येथे भटकंती केली. परंतु ठोसेघर धबधबा बंद होता. त्यामुळे बोरणे घाटात आल्यावर सर्वजण गाडीतून उतरुन फोटोसेशन करु लागले. नसरीन सेल्फी घेत असताना अचानक तिचा तोल गेला. त्यानंतर ती शंभर फूट खोल दरीत पडली. एका झाडाला ती अडकली. यामुळे तिचा जीव थोडक्यात वाचला.
डोंगर, दऱ्यात सेल्फी काढताना कळजी घ्या, युवती पडली शंभर फूट खोल दरीत, झाडात अडकल्याने वाचली pic.twitter.com/pOpyGZJLNE
— jitendra (@jitendrazavar) August 4, 2024
नसरीन कुरेशीसोबत आलेल्या मुलांनी ही माहिती सातारा पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्सच्या युवकांना बोलवले. त्यांनी पोलिसांच्या मदतीने घाटात मदतकार्य सुरू केले. होमगार्ड अभिजित मांडवे दरीत उतरला. त्याने त्या तरुणीला दोरीच्या साह्याने सेफ्टी बेल्टने बांधून बाहेर काढले. या घटनेत नसरीन कुरेशी गंभीर जखमी झाली आहे. तिला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community