विक्रोळी पूर्व द्रुतगती महामार्गावर (Eastern Expressway) एक भरधाव कार झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात कारचालकासह दोन जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात बुधवारी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास विक्रोळी पूर्व (Vikhroli East Expressway) येथे झाला आहे. या अपघात प्रकरणी विक्रोळी पोलिसांनी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Vikhroli Car Accident)
सिद्धार्थ ढगे (२३) आणि रोहित निकम (२९) असे अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. दोघेही विक्रोळी पूर्व येथील कन्नमवार नगर (Kannamwar Nagar) येथे राहणारे होते. सिद्धार्थ हा शिक्षण घेत होता तर रोहित हा विक्रोळी येथे सलून चालवत होता. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अपघातात मृत झालेला सिद्धार्थ ढगे हा भरधाव वेगात आणि बेदरकारपणे कार चालवत होता, त्यामुळे त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले, भरधाव वेगात असलेली कार झाडावर आदळल्या नंतर ती पलटी झाली, त्यात चालक सिद्धार्थ ढगे आणि त्याच्या शेजारी बसलेला त्याचा मित्र रोहित निकम हे गंभीर जखमी झाले. जखमी रोहित निकम यांना तात्काळ राजावाडी रुग्णालयात (Rajawadi Hospital) नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
(हेही वाचा – Iqbal Singh Chahal गृह विभागाच्या सचिवपदी)
अपघाताची माहिती मिळताच पोलिसानी घटनास्थळ गाठले, कारमध्ये अडकून पडलेल्या दोघांना कारमधून बाहेर काढून त्यांना राजावाडी रुग्णालयात आणण्यात आले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या अपघातात कार पूर्णपणे चक्काचूर झाली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. शवविच्छेदना नंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. (Vikhroli Car Accident)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community