Vinod Ghosalkar : अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात सीबीआय चौकशी व्हावी – विनोद घोसाळकर

208
Vinod Ghosalkar : अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात सीबीआय चौकशी व्हावी - विनोद घोसाळकर
Vinod Ghosalkar : अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात सीबीआय चौकशी व्हावी - विनोद घोसाळकर

शिवसेना ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांची काही दिवसांपूर्वी फेसबुक लाईव्ह सुरू असताना हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे सर्व महाराष्ट्र हादरला होता. या प्रकरणी आता त्यांचे वडील शिवसेना उपनेता विनोद घोसाळकर, (Vinod Ghosalkar) पत्नी तेजस्वी यांनी पत्रकार परिषद घेऊन धक्कादायक आरोप केले आहे. तसेच तपास यंत्रणा योग्य दिशेने तपास करत नसल्यामुळे पुढील तपास सीबीआयकडे देण्यात यावा अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात करणार असल्याचे देखील विनोद घोसाळकर (Vinod Ghosalkar) सांगितले.

तपास योग्य पद्धतीने होत नाही – तेजश्री घोसाळकर

८ फेबुवारी रोजी अभिषेक घोसाळकरची (Abhishek Ghosalkar) हत्या झाली.त्यांच्या हत्येचा तपास योग्य रीतीने होत नाही. २८ फेब्रवारी रोजी पोलीस यांना CCTV फुटेज दिले आहेत. या ठिकाणचे सर्व पुरावे सीसीटीव्ही दिले आहे. त्या ठिकाणी धर्मेंद्र मिश्रा आणि मेहुल पारेख हे उपस्थित होते. मॉरीसला त्या ठिकाणी पिस्तुल दिले होते. या पिस्तुलीसाठी लागणाऱ्या गोळ्या खरेदी करण्यासाठी मिश्रासोबत होते. ज्या कार्यक्रमाला अभिषेक यांना बोलावलं, त्या ठिकाणी मलाही बोलावलं. सरकारला विनंती आहे, माझा मुलाचे छत्र राहिलेलं नाही, या प्रकरणात लवकरात लवकर कारवाई योग्य पद्धतीने व्हावी, अशी मागणी घोसाळकर यांनी केली.

(हेही वाचा – Jharkhand : आता झारखंडमध्ये सोरेन कुटुंबात फूट; थोरल्या सुनेने थेट भाजपाचा झेंडा घेतला हाती)

गृहमंत्र्यांसह दोन मंत्र्यांनी चुकीची वक्तव्य केली.- विनोद घोसाळकर

माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या मुलाच्या हत्येबाबत जे वक्तव्य केले आहे ते चुकीचे आहे. मंत्री उदय सामंत यांनी सुद्धा ठाकरे गटातील अंतर्गत वाद आहे असं म्हटलंय. तसंच, मंत्री छगन भुजबळ यांनी सुद्धा असंच वक्तव्य केलं आहे. मी सुद्धा त्या विधानभवन इथं काम केले आहे. ते माझ्या कुटुंबाला ओळखतात. या गुन्हाचा तपास अपूर्ण तसेच प्राथमिक असताना असे वक्तव्य करणे चुकीचे आहे, अशी नाराजीही घोसाळकरांनी व्यक्त केली.

या तपासावर पोलीस यांच्यावर राजकीय दबाव आहे. काही लोकांनी आमच्या विधान भवन येथे आवाज उचलला आहे. फडणवीस असं म्हणाले की, विधानसभेत गोळी कोण घालत आहे हे दिसत नाही. त्या ठिकाणी तिसरा माणूस नव्हता हे दाखवले नाही. मारणारा माणूस दिसत नाही, असा दावाही घोसाळकरांनी केला.

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : भारतात कोणत्या वर्षी झाले किती टक्के मतदान ?)

घटनास्थळावर तिसरी व्यक्ती होती का ?

मॉरिस स्वतः हुन गोळ्या घातल्या हे सुद्धा CCTV मध्ये दिसत नाही. तिसरी व्यक्ती तिथे होती का ? या बाबत आम्ही तीन पत्र, माननीय पोलीस आयुक्त यांना दिले आहेत. अभिषेक आणि मॉरिस याच्यामध्ये ही केस मर्यादित नाही. अमेंद्र मिश्रा येतो कुठून त्याकडे लायसन नव्हते बंदूकचे. त्यांनी दुकानात जाऊन गोळ्या खरेदी केल्या आहेत. आज ४० दिवस झाले आहेत. ९० दिवसांमध्ये कोर्टात चार्ट शीट दाखल झाले पाहिजे. पोलीस कुणाच्या दबावा खाली काम करत आहे. आम्ही मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल करणार असून तपास यंत्रणा बदलून द्या अशी मागणी करणार आहे. पोलीस यंत्रणा कुणाच्या तरी दबावाखाली काम करतंय. त्यामुळं तपास यंत्रणा बदलून देण्याच्या मागणीसाठी आम्ही हायकोर्टात उद्या याचिका दाखल करणार आहोत, असंही घोसाळकर म्हणाले.

मॉरिस याची हत्या झाली का हा पोलीस तपासाचा भाग आहे. याचे फूटज नाही. आता ही चौकशी CBI कडे द्यावे. हे सर्व फुटेज कोर्टात दाखल केले आहेत. मी, आता कोणत्या राजकीय व्यक्तीचे नाव घेणार नाही. पोलिसांनी असं सांगितलं की, त्याची आई तिथे ऍडमिट होती. दवाखान्यात पोलिसांनी आता चौकशी करणे काम करावे. आमच्या तिथेल नगरसेवक यांच्यावर सत्ताधारी लोक दबाव टाकत आहेत. या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे. या दोघांना मारणारा तिसरा कुणी होता का ? याची चौकशी व्हावी, अशी मागणीही घोसाळकरांनी केली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.