हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसराल्लाच्या हत्येविरोधात पाकिस्तानात रविवारी कराचीमध्ये (Pakistan) निदर्शने करण्यात आली. सीएनएनच्या म्हणण्यानुसार, जमाव अचानक हिंसक झाला, त्याला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि अश्रूधुराच्या नळकांड्या सोडल्या. त्यामुळे पाकिस्तानी (Pakistan) लोकांनी पोलिसांवर दगडफेक केली.
(हेही वाचा-State Govt: शेतकऱ्यांसाठी गुडन्युज! राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय)
जमाव कराचीतील अमेरिकन दूतावासाकडे जाऊ लागला, ज्याला रोखण्यासाठी पोलिसांनी कडक कारवाई केली. या रॅलीचे नेतृत्व पाकिस्तानातील शिया इस्लामिक राजकीय संघटना मजलिस वाहदत-ए-मुस्लिमीन (MWM) करत होते. नसरल्लाच्या हत्येच्या निषेधार्थ पाकिस्तानच्या इतर भागांतही मोर्चे काढण्यात आले. (Pakistan)
लेबनॉनमध्ये रविवारी इस्रायलचा हल्ला
लेबनॉनच्या (Lebanon) आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, रविवारी इस्रायली हल्ल्यात किमान 105 लोक मारले गेले. तर 359 जण जखमी झाले आहेत. सर्वाधिक मृत्यू दक्षिण लेबनॉनमध्ये झाले असून तेथे 48 लोक मारले गेले आहेत. बेका खोऱ्यात ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. (Pakistan)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community