सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओची गोष्ट; मुंबईत उडाली होती खळबळ

93

एका व्हायरल व्हिडिओने मुंबईत एकच खळबळ उडवून दिली होती, परंतु या व्हिडिओत दाखविण्यात आलेली घटना मुंबईत कुठेही घडलेली नसल्याचे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले असले तरी हा व्हिडीओ नेमका कुठल्या शहरातील आहे, किंवा हा व्हिडीओ खरा आहे की एखाद्या वेबसिरीजसाठी शूट केला आहे याचा शोध मुंबई पोलिसांकडून घेण्यात येत आहे.

मुंबई शहरात शुक्रवारी सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता. या व्हिडिओतील दृश्य बघून अनेकांच्या काळजात धस्स झाले, या घटनेची सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली, अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडिओची सत्यता न तपासता हा व्हिडीओ फॉरवर्ड केला.

व्हायरल व्हिडिओतील भयानक दृश्य……

रस्त्यावर एक मोटार येऊन थांबते, त्या मोटारीतून एक तरुणी उतरते, व मोटार क्षणात निघून जाते, त्याच वेळी डोक्यावर हॅट अंगावर काळ्या रंगाचा कोट घातलेला एक इसम रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मोटारीच्या पाठीमागून तरुणीच्या दिशेने येतो, त्या रस्त्यावर हा इसम तरुणीला पाठीमागून पकडून तिच्या गळ्यावर हत्याराने घाव करून करून तिची हत्या करतो, तरुणी जमिनीवर कोसळताच हा इसम तिचे दोन्ही पाय पकडून रस्त्यावरून ओढत तिला रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मोटारीजवळ घेऊन जातो.

व्हिडिओसोबत टाकण्यात आलेली पोस्ट अशी होती की …..

शुक्रवारी हा व्हिडिओ सोशल मीडिया, आणि ट्विटरवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला या व्हिडीओसोबत एक पोस्ट टाकण्यात आली होती, “#हॅटमॅन किलर्स इन मुंबई स्नेअक्स अप ऑन अ वूमन विथ नाईफ अँड अटॅक हर ऑन रोड. द इन्सिडेंट इज कॉट ऑन अ सीसीटीव्ही फुटेज अँड सेड टू हॅपन इन अंधेरी,” याप्रकारची पोस्ट टाकून हा व्हिडिओ सोशल मीडिया आणि ट्विटर वर टाकण्यात आला होता. शुक्रवारी हा व्हिडिओ तुफान व्हायरल होऊन मुंबईत खळबळ उडवून दिली.

पोलिसांनी सांगितली सत्यता ……

अंधेरी पूर्व पश्चिम परिसरात असलेल्या पोलीस ठाण्यामध्ये या व्हिडिओ संदर्भात चौकशी करण्यासाठी पोलीस ठाण्यातील फोन खणखणू लागले, परंतु अंधेरी परिसरात मागील अनेक दिवसात असा प्रकार कुठेही घडला नाही किंवा कुठल्याही महिलेचा मृतदेह आढळला नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत होते. या व्हायरल व्हिडिओची सत्यता पडताळण्यासाठी पोलिसांनी हा व्हिडिओ बारकाईने तपासला असता या व्हिडिओ मधील दृश्यात दाखविण्यात आलेली महिला हल्लेखोराला कुठल्याही प्रकारचा विरोध करताना दिसून येत नाही, तसेच तिने स्वतःची सुटका करण्यासाठी कुठलाही प्रयत्न करीत नसल्यामुळे एक तर हा व्हिडीओ प्रॅन्क असू शकतो अथवा एखाद्या वेबसिरीजसाठी बनविण्यात आलेला व्हिडिओ असू शकतो असा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांकडून काढण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री उशिरा मुंबई पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले की, व्हायरल झालेल्या व्हिडिओतील घटना मुंबईत कुठेही घडलेली नाही, हा व्हिडिओ खरा नसल्याचे मुंबई पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले.

सोशल मीडियावरून हटविण्यात आला व्हिडीओ…

मुंबई खळबळ उडवून देणाऱ्या या व्हिडीओमुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाली होती, हा व्हिडिओ मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत पोहचला होता, मुंबईत अशी घटना घडली आहे का याची चौकशी करण्यात आली मात्र मुंबईत कुठेही अशी घटना घडलेली नसल्यामुळे हा व्हिडिओ आणखी व्हायरल होऊ नये म्हणून काळजी घेण्यात आलेली असून हा व्हिडीओ सोशल मीडियावरील काढण्याची विनंती संबंधित यंत्रणेला देण्यात आली. त्यानंतर तात्काळ हा व्हिडिओ ट्विटर तसेच इतर सोशल मीडियावरून हटविण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.