Rajasthan येथे सापडला अल्-कायदाचा शस्त्रसाठा 

158
शस्त्रसाठा सापडलेली जागा

राजस्थानातील (Rajasthan) अलवर जिल्ह्यातील भिवडी येथे अल्-कायदाचे प्रशिक्षण शिबिर चालू असल्याची माहिती नुकतीच उघड झाली. २२ ऑगस्टला दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई करत ६ संशयित लोकांना अटक केली होती. पोलिसांनी संशयास्पद व्यक्तींच्या लपण्याच्या ज्या जागेवर धाड घातली, ती जागा पोलीस ठाण्यापासून अवघ्या ७०० मीटर अंतरावर आहे. हे संशयित जंगलातील टेकडीवर शस्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण घेत होते.

(हेही वाचा Sexual Assaulted : पुण्यात कीर्ती विद्यालयातील क्रीडा शिक्षकाकडून १२ वर्षीय मुलीचे ४ वर्षे लैंगिक शोषण)

अशातच राजस्थान (Rajasthan) पोलिसांना या दहशतवादी कारवायांचा कोणताही सुगावा न लागल्यामुळे अनेक मोठे प्रश्‍न निर्माण होत आहेत. दिल्ली पोलिसांनी कारवाई केल्यानंतरच राजस्थान पोलिसांना अल् कायदासारख्या दहशतवादी संघटना राजस्थानमध्ये सक्रीय असल्याची माहिती मिळाली. हे स्वत: राज्याचे पोलीस महासंचालकांनीही मान्य केले आहे. ते म्हणाले की, संशयित व्यक्तींचा राजस्थानशी (Rajasthan) काय संबंध आहे ?, याचा तपास करण्यात येत आहे. भिवडी येथील दहशतवादी तळासंदर्भात अनेक धक्कादायक खुलासे झाले असून संशयित व्यक्ती भाड्याच्या खोलीत रहात होत्या; त्या खोल्यांमधून पोलिसांना अवैध शस्त्रे, दारूगोळा आणि आतंकवादी विचारसरणीची पुस्तकेही सापडली आहेत.  आजूबाजूला रहाणार्‍या लोकांच्या म्हणण्यानुसार येथे फारसे कुणी येत नव्हते.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.