Weapons Cache Seized : मुसाफिरखान्यात हत्यारांचा जखीरा जप्त, एकाला अटक

९ इंच लांब असलेले हत्यार विक्रीसाठी ठेवणे गुन्हा असल्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

261
Weapons Cache Seized : मुसाफिरखान्यात हत्यारांचा जखीरा जप्त, एकाला अटक
Weapons Cache Seized : मुसाफिरखान्यात हत्यारांचा जखीरा जप्त, एकाला अटक

दक्षिण मुंबईतील मुसाफिरखाना येथील एम. के. मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात तीक्ष्ण हत्यारांचा साठा पोलिसांना छाप्याच्या दरम्यान मिळून आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी ४२ वर्षीय इसमाला अटक केली असून त्याने ही हत्यारे विक्रीसाठी ठेवली होती अशी माहिती पोलिसांना दिली आहे. ९ इंच लांब असलेले हत्यार विक्रीसाठी ठेवणे गुन्हा असल्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Weapons Cache Seized)

सय्यद कमर सय्यद अख्तर हुसेन (४२) असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. वांद्रे पूर्व येथे राहणारा सय्यद कमर हा मोठ्या प्रमाणात हत्यारांचा साठा घेऊन मुसाफिर खाना येथील एम. के. मार्केट या ठिकाणी विक्री करीत असल्याची माहिती माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीसाना मिळाली होती. तसेच सय्यद हा अमरावती येथे दाखल असलेल्या एका गुन्ह्यात फरार होता व त्याच्या शोधात अमरावती गुन्हे शाखेचे पथक देखील मुंबईत दाखल झाले होते. (Weapons Cache Seized)

(हेही वाचा – Parliament Security: संसदेचे कामकाज सुरू असताना सुरक्षा भंग प्रकरणाऱ्या मास्टरमाइंडला पोलीस कोठडी)

यांना घेतले ताब्यात 

माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष धनवटे, सुशीलकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. प्रवीण शिंदे, सांगळे, पोलीस अंमलदार साळुंखे, लोकेकर, हाक्के, एटीसी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शंकर राठोड, पोलीस शिपाई देवरे आणि अमरावती गुन्हे शाखेचे सपोनि. महेश इंगोले, राजकिरण येवले या पथकाने शुक्रवारी दुपारी मुसाफिर खाना येथील एम. के. मार्केट या ठिकाणी छापा टाकून सय्यद कमर सय्यद अख्तर हुसेन याला ताब्यात घेण्यात आले. (Weapons Cache Seized)

२०२ नग हत्यारे जप्त

तसेच त्याच्याकडे विक्रीसाठी ठेवण्यात आलेले, ९ इंचाचे धारदार हत्यारे, बटन चाकू, चायना चाकू, फोल्डिंग चाकू असे एकूण २०२ नग हत्यारे जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेले हत्यारे बेकायदेशीररित्या बाळगून ती विक्रीसाठी ठेवण्यात आली आली होती अशी माहिती वपोनि. संतोष धनवटे यांनी दिली आहे. याप्रकरणी सय्यद कमर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (Weapons Cache Seized)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.