West Bengal Crime: डॉक्टरांनी बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन महिलेवर केले अत्याचार; अश्लील छायाचित्रेही काढली

154
West Bengal Crime: डॉक्टरांनी बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन महिलेवर केले अत्याचार; अश्लील छायाचित्रेही काढली
West Bengal Crime: डॉक्टरांनी बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन महिलेवर केले अत्याचार; अश्लील छायाचित्रेही काढली

पश्चिम बंगालमधील (West Bengal Crime) उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील डॉक्टरने एका महिला रुग्णावर अनेकदा बलात्कार केल्याचा आरोप आहे. प्रकरण हसनाबाद भागातील आहे. पीडितेचे म्हणणे आहे की, ती उपचारासाठी डॉ. नूर आलम सरदार यांच्या क्लिनिकमध्ये गेली होती. डॉक्टरांनी तिला भूल येण्याचे इंजेक्शन दिल्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. उत्तर 24 परगणा येथील हसनाबाद भागात ही महिला एकटीच राहते. तिचा नवरा परदेशात राहतो. महिलेने पतीला फोनवर बलात्काराची घटना सांगितली. पती भारतात परतल्यानंतरच दोघांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. (West Bengal Crime)

आरोपीला अटक
डॉक्टरांनी पीडित महिलेला ब्लॅकमेल करण्यासाठी अश्लील फोटोही काढले. त्यानंतर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत ​​चार लाख रुपयांची मागणी केली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एफआयआरनंतर काही तासांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, डॉक्टरने महिलेवर अनेकदा बलात्कार केला होता. (West Bengal Crime)

शुद्धीवर आल्यावर तिने पाहिले की …
पतीने सांगितले की त्याच्या पत्नीला इंजेक्शन घ्यायचे नव्हते, परंतु डॉक्टरांनी सांगितले होते की इंजेक्शन घेतल्याने लवकर बर वाटेल. इंजेक्शननंतर ती बेशुद्ध पडू लागली. डॉक्टरांनी तिला बेडवर झोपायला सांगितले. शुद्धीवर आल्यावर तिने पाहिले की तिने कपडे नीट घातलेले नाहीत. तिच्यावर बलात्कार झाल्याचे तिला समजले. पतीने सांगितले की, या घटनेनंतर डॉक्टर ब्लॅकमेल करत असताना बदनामीच्या भीतीने पत्नीने आत्महत्येचा प्रयत्नही केला. शेजाऱ्यांनी आत्महत्येची माहिती देताच मी भारतात परतलो आणि पोलिसांत तक्रार दाखल केली. (West Bengal Crime)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.