Ambernath मध्ये चाललंय काय? अज्ञात तरुणांनी तलवारीने फोडले माजी नगरसेवकाचे कार्यालय 

161
Ambernath च्या राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात भाजपाचे माजी नगरसेवक रोहित राजू महाडिक (Rohit Raju Mahadik) यांच्या ऑफिसवर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला (Ambarnath Crime News) केला असल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी (5 एप्रिल) रात्री हातात तलवारी घेऊन हा हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये ऑफिसचं मोठं नुकसान झालं असून ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यावर देखील तलवारीने हल्ला करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ धाव घेत पुढील तपास सुरू केला आहे. तर या घटनेचा अधिक तपास सध्या पोलीस करत असून या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. (Ambernath)

(हेही वाचा – Love Jihad : आसिफ कुरेशीने ओळख लपवून केला पीडितेवर अत्याचार; आशिष असल्याचा केला बनाव)

अवघ्या 23 सेकंदात हल्ला चढवून हल्लेखोर पसार   
मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथमधील भाजपाचे माजी नगरसेवक (Former BJP corporator) रोहित राजू महाडिक यांचं अंबरनाथ पूर्वेच्या बी केबिन रोडवरील स्वानंद शॉपिंग कॉम्प्लेक्स शेजारी कार्यालय आहे. या कार्यालयात शनिवारी रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास अचानक तोंडाला रुमाल बांधलेले आणि हातात तलवारी घेतलेले 10 ते 12 हल्लेखोर आले. त्यांनी ऑफिसच्या काचा तलवारीने फोडत ऑफिसमध्ये घुसून ऑफिसमध्ये काम करणाऱ्या तरुणावर देखील तलवारीने हल्ला चढवला. तसंच ऑफिसमधील खुर्च्यांचीही तलवारीने वार करत नासधूस केली.

(हेही वाचा – धर्मावर बोलण्याचा कोणालाही अधिकार नाही; Raj Thackeray, Jitendra Awhad यांच्याविरोधात संत समितीच्या बैठकीत ठराव)

या कार्यालयात शनिवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास अचानक 10 ते 12 जणांचे टोळके तोंडाला रुमाल बांधून आणि हातात तलवारी घेऊन दाखल झाले. त्यांनी ऑफिसच्या काचा फोडल्या. तसेच ऑफिसमधील खुर्च्यांचीही तोडफोड केली. यामध्ये ऑफिसचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivajinagar Police Station) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सध्या हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. मात्र या घटनेने अंबरनाथ शहराच्या राजकीय वर्तुळात एक खळबळ उडाली आहे.

 

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.