उमेश पाल हत्याकांड : जाणून घ्या आतापर्यंत किती एन्काऊंटर झाले?

143

प्रयागराज येथील उमेश पाल हत्याकांडमधील मुख्य आरोपी आणि त्याच्या साथीदाराचा उत्तर प्रदेश पोलिसांकडून १३ एप्रिल २०२३ रोजी एन्काऊंटर करण्यात आला आहे. मुख्य आरोपी हा उत्तर प्रदेशमधील कुख्यात गँगस्टर अतिक अहमद याचा मुलगा असद अहमद होता. उमेश पाल हत्याकांडपासून तो आणि त्याचा साथीदार दोघेही फरार झाले होते. त्या दोघांवर उत्तर प्रदेश सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. झाशी येथे झालेल्या चकमकीत त्यांचा एन्काऊंटर झाला. एन्काऊंटरनंतर त्यांच्याकडून पोलिसांनी काही विदेशी हत्यारं जप्त केली आहेत.

प्रयागराज येथील उमेश पाल हत्याकांड प्रकरणाचा तपास करतांना उत्तर पोलीस यांच्याकडून आतापर्यंत अनेक एन्काऊंटर झाले आहेत. पोलिसांना २७ फेब्रुवारी रोजी पहिले मोठे यश मिळाले. प्रयागराजच्या धुमनगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुलेमसराय येथे या हत्याकांडात सहभागी असलेला आरोपी अरबाज याचा पोलिसांच्या चकमकीत एन्काऊंटर झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्येच्या वेळी अरबाज कार चालवत होता, ज्यामध्ये शूटर गुलाम उमेश पाल याला ठार मारण्यासाठी आला होता. त्यानंतर ६ मार्च रोजी पोलिसांना दुसरे यश आले. या प्रकरणातील दुसरा आरोपी शुटर उस्मान चौधरी याचा एन्काऊंटर झाला. उमेश पालवर यानेच गोळीबार केला होता. त्यानंतर १३ एप्रिल २०२३ रोजी पोलिसांनी उमेश पाल हत्याकांडमधील मुख्य आरोपी आणि त्याच्या साथीदाराचा एन्काऊंटर केला.

(हेही वाचा ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्यामुळे हिंदू तरुण ५ दिवस होते तुरुंगात )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.