Sanjay Pandey : माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी स्वतःला तिहार रिटर्न का म्हटले?

मागील काही आठवड्यापासून पांडे हे पश्चिम मध्य मुंबईत लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची चर्चा रंगली होती.

158
Sanjay Pandey : माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी स्वतःला तिहार रिटर्न का म्हटले?

माजी आयपीएस अधिकारी संजय पांडे (Sanjay Pandey) यांचे सोशल मीडियावर एक पत्र व्हायरल होत आहे, या पत्रात त्यांनी स्वतःचा उल्लेख तिहार रिटर्न आणि ‘पीएमएलए’आरोपी असा केल्यामुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. संजय पांडे हे लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले आहे. (Sanjay Pandey)

संजय पांडे (Sanjay Pandey) हे माजी आयपीएस अधिकारी असून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आहेत. मागील काही आठवड्यापासून पांडे हे उत्तर मध्य मुंबईत लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) लढविणार असल्याची चर्चा रंगली होती. स्वतः पांडे यांनी लोकांचा निवडणूक लढविण्यासाठी आग्रह असल्याचे ट्वीट केले होते. या ट्वीटनंतर मुंबईतून पांडे हे निवडणूक लढविणार असल्याचे वृत्त देखील काही दैनिकात छापून आले होते. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात पांडे यांना काही महिन्यांपूर्वी अटक झाली होती व ते तिहार तुरुंगात कैदेत होते. या गुन्ह्यात त्यांना काही आठवड्यापूर्वी जामीन मिळाला आहे. (Sanjay Pandey)

(हेही वाचा – Salman Khan: सलमान खान हल्ला प्रकरणातील एका आरोपीची पोलीस कोठडीत आत्महत्या)

पांडे यांनी बुधवारी एक पत्र ट्विट करून लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) लढविणार नसल्याचे पत्रात म्हटले आहे. पत्राच्या सर्वात शेवटी त्यांनी स्वतःच्या नावापुढे तिहार रिटर्न ‘पीएमएलए’आरोपी असा उल्लेख करून स्वत:च्या स्वाक्षरीचे पत्र ट्वीट केले आहे. या पत्रात तिहार रिटर्न आणि ‘पीएमएलए’आरोपी हा उल्लेख चर्चेचा विषय बनला आहे. त्यांनी तिहार रिटर्नचा उल्लेख करून खळबळ उडवून दिली आहे. मात्र पत्रात तिहार रिटर्न लिहण्यामागे काय उद्देश आहे हे कळू शकले नाही. (Sanjay Pandey)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.