तुम्ही अनेकदा पाहिले असेल की पार्लर किंवा घरात लोक डोक्यावर कापड ठेऊन गरम पाण्याची वाफ घेतात, पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की हे का करतात? तसेच वाफ घेताना लोक गरम पाण्यात कडूलिंब, मीठ आणि लिंबू देखील टाकतात. दरम्यान आज आपण चेहऱ्यावर वाफ घेण्याचे रहस्य जाणून घेऊयात.
चेहऱ्यावर वाफ घेण्याचे फायदे
त्वचा स्वच्छ करते
जे लोक नियमित चेहऱ्यावर वाफ घेतात, त्यांच्या त्वचेची छिद्रे उघडतात ज्यामुळे घाण आणि मृत त्वचा बाहेर येते. विशेषत: ज्यांना ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्सचा त्रास आहे त्यांच्यासाठी वाफ घेणे हा रामबाण उपाय आहे, यामुळे चेहरा स्वच्छ होतो.
(हेही वाचा – आषाढी एकादशी २०२३: वारीतील दिंड्यांना मिळणार ओळखपत्र)
रक्तप्रवाह सुरळीत होतो
तुम्ही तुमच्या त्वचेची कितीही काळजी घेतली तरी त्वचा निस्तेज आणि निर्जलित दिसते. अशातच गरम पाण्याच्या वाफेचा आधार घेतल्याने त्वचेचा रक्तप्रवाह सुरळीत होता.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community