धावत्या वाहनातच विधवेवर सामूहिक बलात्कार, चौघांवर गुन्हा दाखल

संतापाची बाब म्हणजे या महिलेच्या प्रियकरासमोरच दोघांनी तिच्यावर अत्याचार केला

175
धावत्या वाहनातच विधवेवर सामूहिक बलात्कार, चौघांवर गुन्हा दाखल
धावत्या वाहनातच विधवेवर सामूहिक बलात्कार, चौघांवर गुन्हा दाखल

बीड जिल्ह्यातून शुक्रवारी (४ ऑगस्ट) रोजी एक धक्कादायक घटना समोर आली. एका विधवा महिलेवर दोघांनी धावत्या जीपमध्ये सामूहिक बलात्कार केला. संतापाची बाब म्हणजे या महिलेच्या प्रियकरासमोरच दोघांनी तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलिसांत चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गाडीत अत्याचार केल्यावर पिडीतेला एका गावात नेऊन एका दुसऱ्या महिलेने पाईप आणि चप्पलने मारहाणही केल्याचा आरोपही पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे.

बीडच्या शिवाजीनगर पोलिसांत २६ वर्षिय विधवा पिडीतेने दिलेल्या तक्रारीनुसार, या महिलेच्या पतीचे पाच वर्षांपूर्वी निधन झाले. त्यानंतर ती आपल्या तीन वर्षांच्या मुलीसोबत बीड शहरात वास्तव्यास राहू लागली. दरम्यानच्या काळात बीड तालुक्यातील सात्रापोत्रा येथील सुरेश नामदेव लंबाटे याच्याशी पिडीतेचे प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर पिडीता एक वर्षापासून सुरेश आणि आपल्या तीन वर्षांच्या मुलीसोबत बीडमध्ये रहात आहे.

(हेही वाचा – Legislative Council : विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसचा दावा)

पीडिता रस्त्यावरुन पायी जात असताना तिथे चारचाकी गाडी आली. त्या गाडीतून सुरेश लंबाटे खाली उतरला आणि पीडित महिलेला गाडीत बसण्यास सांगितले. त्यामुळे तिही गाडीत बसली. पण, याच गाडीत सुरेश लंबाटेचा भाऊ अमोल नामदेव लंबाटे आणि बापूराव हावळे बसले होते. तर, गाडी काही अंतरावर जाताच अमोल लंबाटेनी पिडीतेला अचानक मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच तिच्यासोबत लज्जास्पद कृत्य करायला सुरुवात केली. त्यानंतर अमोल आणि बापूराव यांनी धावत्या जीपमध्येच बलात्कार केला. सोबतच पीडितेला लाथा बुक्क्यांनी तसेच चापटाने मारहाण केली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.