एआय इंजिनिअर अतुल सुभाष आत्महत्येप्रकरणी (Atul Subhash suicide case) बंगळुरू पोलिसांनी पत्नी, सासूसह ३ जणांना अटक केली आहे. बंगळुरू पोलिसांचे डीसीपी शिवकुमार (DCP Sivakumar) यांनी सांगितले की, अतुल सुभाषची सासू निशा सिंघानिया आणि मेहुणा अनुराग यांना प्रयागराज येथून अटक करण्यात आली आहे. तर पत्नी निकिता हिला गुरुग्राममधून पकडण्यात आले आहे. या सर्वांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले, तेथून त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. (Atul Subhash suicide case)
हेही वाचा-Maharashtra Weather: अनेक ठिकाणी पारा घसरला! ‘या’ ठिकाणी सर्वात कमी तापमानाची नोंद
निकिता सिंघानिया (Nikita Singhania) आणि तिच्या कुटुंबियांना बंगळुरू पोलिसांनी शुक्रवारी नोटीस बजावून तीन दिवसांत चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. त्यानंतर सिंघानिया कुटुंबियांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात अंतरिम जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. आता तिघांची अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त शिवकुमार यांनी दिली. (Atul Subhash suicide case)
अतुल सुभाष यांनी चित्रित केलेला व्हिडीओ आणि सुसाइड नोटची न्यायवैधक प्रयोगशाळेत तज्ज्ञांकडून तपासणी करण्यात येत आहे. तसेच अतुल सुभाष यांचा भाऊ विकास कुमार यांच्या तक्रारीनंतर बंगळुरू पोलिसांनी सिंघानिया कुटुंबियांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता. यामध्ये निकिता सिंघानिया आरोपी क्र. १, त्यांची आई निशा आरोपी क्र. २ आणि भाऊ अनुराग आरोपी क्र. ३ आहे. (Atul Subhash suicide case)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community