ट्रॅव्हलमधून जाणाऱ्या एका महिलेकडून पोलिसांनी १३ किलो गांजा जप्त केला आहे. ही कारवाई १५ जानेवारीला दुपारी साडेतीनच्या सुमारास करण्यात आली. जबिना खान (३२) नावाची ही महिला नागपूरमार्गे बंगरुळू येथे जात होती.
( हेही वाचा : देशात घातपाताचा मोठा कट; राम मंदिर, २६ जानेवारी, जी-२० परिषद दहशतवाद्यांचे लक्ष्य)
जबिना खान या महिलेने अजनी चौकातून प्रवास सुरू केला असता तेथील वाहतूक पोलिसांना गांजाचा वास आला तेव्हा त्यांनी बस थांबवून धंतोली पोलिसांना माहिती दिली. यावर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी दाखल होत या महिलेच्या बॅगेची झडती घेतली. यावेळी या महिलेकडे तब्बल १३ किलो गांजा आढळला. ताब्यात घेऊन विचारणा केल्यावर हा गांजा बंगरुळुला घेऊन जात असल्याचे तिने सांगितले. पोलिसांनी या कारवाईत जबिनाला अटक केली असून १३ किलो गांजा जप्त केला आहे.
गांजा पाठवण्यासाठी कॅरिअर म्हणून महिलेचा वापर…
या महिलेला गांजा घेऊन बंगरुळु येथे जाण्यास सांगितले. गणेशपेठ स्थानक परिसरातून बसल्यास शंका येण्याची शक्यता असल्याने तिने अजनी येथून जाण्याचा निर्णय घेतला. मात्र तेथील वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे ती पोलिसांच्या जाळ्यात सापडली. गांजा कोणाला द्यायचा हे तिला बंगरुळुला पोहोचल्यावर सांगण्यात आले त्यामुळे या महिलेचा केवळ कॅरिअर म्हणून वापर करण्यात आला.
Join Our WhatsApp Community