Gold Smuggling : सोने तस्करी करणाऱ्या टोळीला मदत करणारी ‘ती’ महिला कॉन्स्टेबल बडतर्फ

280
Fraudulent YouTuber : विमानतळावरील शोरुममधून 'हा' युट्यूबर करत होता सोन्याची तस्करी

सोने तस्करांना विमानतळाच्या बाहेर सोने काढण्यास मदत करणाऱ्या मुंबई पोलीस दलातील महिला पोलीस कॉन्स्टेबलला सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. या महिला कॉन्स्टेबलला सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ३५ लाख रुपयांच्या सोन्यासह मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुद्देमालासह पकडण्यात आले होते.

विमानतळ परिसरातून तस्करी केलेले सोने सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी सोन्याची तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय सिंडिकेटच्या सदस्याला मदत केल्याचा आरोप कॉन्स्टेबलवर लावण्यात आला आहे. संध्याराणी आनंदराव चव्हाण असे बडतर्फ करण्यात आलेल्या महिला पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. मुंबई पोलीस दलातील विशेष शाखा २ मध्ये कार्यरत असणाऱ्या संध्याराणी या कॉन्स्टेबलला मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे इमिग्रेशन येथे तैनात करण्यात आले होते.

विशेष शाखेच्या सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, २३ एप्रिल रोजी सोन्याची तस्करी करणाऱ्या सिंडिकेटचा एक विदेशी मेम्बर थायलंडमधील बँकॉक येथून एअर इंडियाच्या एआय-३३१ या विमानाने मुंबईत येत असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाच्या गुप्तचर पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुप्तचर पथकाने या विदेशी नागरिकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता, तो सोने तस्करी करणाऱ्या टोळीचा सदस्य असल्याची माहिती चौकशीत समोर आले, तसेच मुंबई पोलीस दलातील एक महिला कॉन्स्टेबल त्यांना विमानतळावरुन सोने बाहेर काढण्यास मदत करत असल्याचेही समजले. या माहितीच्या आधारे सीमाशुल्क विभागाच्या गुप्तचर पथकाने संध्याराणी चव्हाणला विमानातळाच्या बाहेर ३५ लाख किमतीचे सोने बाहेर घेऊन जाताना रंगेहात पकडण्यात आले. तिच्याजवळून सीमा शुल्क विभागाने ६८५ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले होते.

(हेही वाचा – Himachal Cloudburst : हिमाचलमध्ये ढगफुटी, एकाचा मृत्यू तर ३ जखमी)

संध्याराणी ही महिला कॉन्स्टेबल ड्युटीवर असताना तिच्या आईची तब्येत ठीक नसल्याचे कारण सांगून ती ड्युटीच्या वेळेपूर्वी विमान तळातून बाहेर पडत होती, सीमाशुल्क विभागाने तस्करीच्या रॅकेटमध्ये तिचा सहभाग आणि सोने तस्करी टोळीच्या सदस्यांशी असलेल्या संबंधांचा तपशीलवार अहवाल तयार केला आणि तो मुंबई पोलिसांना पाठविण्यात आला होता. या अहवालावर कारवाई करताना चव्हाण यांना प्रथम विभागीय चौकशी सुरू असे पर्यंत निलंबित करण्यात आले होते, तिला चौकशी अधिकाऱ्यांसमोर तिच्या बचावात युक्तिवाद करण्याची संधी देण्यात आली होती, परंतु तीने स्वतःला निर्दोष ठरवणारे पुरावे सादर करू शकली नाही, आणि चौकशीत तिच्यावर आरोप सिद्ध झाल्या नंतर तिला काही दिवसांपूर्वी पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले, अशी माहिती एका पोलीस अधिकारी यांनी दिली. तीच्या बडतर्फीचा आदेश पोलीस उपायुक्त एसबी-२ यांच्या कार्यालयाने नुकताच जारी केला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.