धक्कादायक! प्रवासी कारमध्ये महिलेचा विनयभंग; १० महिन्यांच्या चिमुकलीसह धावत्या गाडीतून मारली उडी, मुलीचा मृत्यू

211

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धावत्या गाडीत महिलेचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रवाशांनी विनयभंगाचा प्रयत्न केल्यामुळे वीस वर्षीय महिनेले आपल्या १० महिन्यांच्या मुलीसह धावत्या गाडीतून बाहेर उडी मारली. या घटनेत दहा महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला असून संबंधित महिला जखमी झाली आहे. या प्रकरणी विरारच्या मांडवी पोलीस ठाण्यात वाहनचालक आणि इतर ३ अनोळखी प्रवाशांविरोधात विनयभंग आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

( हेही वाचा : देशभरातील स्वच्छतागृहांची माहिती एका क्लिकवर; हे अनोखे अ‍ॅप आहे तरी कसे?)

पीडित महिला वाडा येथे राहणारी असून ती आपल्या १० महिन्यांच्या मुलीसह नालासोपारा पूर्वेच्या पेल्हार गावातील आपल्या नातेवाईकांकडे आली होती. शनिवारी ही महिला पुन्हा परत जाण्यासाठी निघाली होती. यावेळी खासगी वाहनात चालकासह अन्य ३ प्रवासी होती. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील पेल्हारजवळील नोवेल्टी हॉटेलच्या समोरून जात असताना या महिलेने मुलीसह गाडीतून उडी मारली. यामध्ये महिला जखमी असून १० महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे.

महिलेने पालघरच्या वाडा येथे जाण्यासाठी GJ 15, PJ 1137 या इको कारने प्रवास सुरू केल होता. श्रमजीवी संगठनेच्या महिला आघाडीने पोलीस पीडित महिलेवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.