टिटवाळा (Titwala) रेल्वे परिसरात एका महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची घटना आहे. ही महिला रेल्वे रुळावरून घरी पायी जात असताना तिच्यावर बलात्कार झाला. टिटवाळा रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली. या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करून महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी विशाल चव्हाण नावाच्या आरोपीला अटक केली आहे. सोमवारी, 13 नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.
पीडित तरुणी शहाड येथील एका खासगी कंपनीत काम करते. सोमवारी रात्री कंपनीतून बाहेर पडल्यानंतर पीडित महिला लोकल ट्रेनने टिटवाळा (Titwala) स्टेशनवर पोहोचली. तिचे घर स्टेशनपासून जवळच असल्याने ती घराच्या दिशेने रेल्वे रुळावरून चालली होती आणि ती पतीसोबत मोबाईलवर बोलत होती. यावेळी आरोपींनी तिचा पाठलाग सुरू केला. संधी मिळताच आरोपीने महिलेला बळजबरीने रेल्वे ट्रॅकजवळील झुडपात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. महिलेने त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपी गुन्हा करून पळून गेला.
(हेही वाचा Muslim : अहमदनगरमध्ये धर्मांध मुसलमानांचा हिंसाचार; श्री कानिफनाथ समाधी मंदिरात भजनी मंडळाला मारहाण)
घडलेला सगळा प्रसंग या पीडित महिलेने आपल्या पतीला सांगितला. त्यानंतर दोघांनीही येऊन पोलिसात या संदर्भात तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन टिटवाळा (Titwala) स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी विशालला अवघ्या काही तासात अटक केली. मात्र, हा सगळा प्रकार रेल्वेच्या हद्दीत घडल्याने पोलिसांनी हा गुन्हा रेल्वे पोलिसांकडे वर्ग करत आरोपीला देखील रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.
Join Our WhatsApp Community