कुर्ला पश्चिम येथील मेट्रो बांधकामाच्या ठिकाणी सुटकेस (Woman’s Body Found In Suitcase) मध्ये मिळून आलेल्या महिलेच्या हत्येची उकल करण्यात आली आहे. ही महिला धारावी परिसरातील राहणारी असून तिच्यासोबत राहणाऱ्या तिच्या प्रियकराने तिची हत्या करून मृतदेह सुटकेस मध्ये टाकून कुर्ला येथे फेकला असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखा कक्ष ११आणि कक्ष ५ यांच्या संयुक्त तपासात या हत्येची उकल करण्यात आली असून एकाला अटक करण्यात आली आहे.
कुर्ला पश्चिम एलबीएस रोड वरील शांती नगर येथे सुरू असलेल्या मेट्रो कामाच्या ठिकाणी रविवारी कुर्ला पोलिसांना एक बेवारस सुटकेस (Woman’s Body Found In Suitcase) मिळून आली होती. या सुटकेस मध्ये एका महिलेचा मृतदेह पोलिसांना आढळून आला होता, या महिलेच्या गळ्यावर मारल्याचे व्रण होते, व मृतदेह दुमडून सुटकेस मध्ये बंद करण्यात आला होता.
प्राथमिक तपासावरून या महिलेची हत्या केल्याचे समोर आले, कुर्ला पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरुद्ध हत्या आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मृत महिलेची ओळख पटलेली नसल्यामुळे पोलिसांकडून ओळख पटविण्याचे काम सुरू होते. पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी मृत महिलेचे छायाचित्र सर्वत्र व्हायरल करण्यात आले होते.
मृत महिलेची बहीण ही धारावी परिसरात राहण्यास असून तीने हे छायाचित्र ओळखून त्याच्यावर असणाऱ्या गुन्हे शाखा कक्ष ११ च्या अधिकारी यांच्याशी तीने संपर्क साधला. गुन्हे शाखा कक्ष ११ आणि कक्ष ५ च्या पथकाने धारावीत राहणाऱ्या महिलेला कक्ष ५च्या कार्यालयात बोलावून मृतदेहाची ओळख पटवली असता मृत महिला यामहिलेची बहीण असून ती धारावी मध्ये तिच्या प्रियकरासोबत धारावीत लग्न न करता एकत्र राहण्यास होती अशी माहिती तिने पोलिसांना दिली.
Join Our WhatsApp Communityमृत महिला आणि तिचा प्रियकर हे दोघे ओरीसा राज्यातील राहणारे आहेत. गुन्हे शाखेने तात्काळ तपासाची चक्र फिरवून ओरिसा येथे पळून जाण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या मृत महिलेच्या प्रियकराला ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली. गुन्हे शाखेने या हत्ये प्रकरणी प्रियकराला अटक केली आहे. लग्न करण्यासाठी तगादा लावल्यामुळे ही हत्या केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.