Women : १५५७ महिलांची सासरच्यांविरुद्ध पोलिसांत धाव

62
Women : १५५७ महिलांची सासरच्यांविरुद्ध पोलिसांत धाव

पतीसह सासरच्या छळाला कंटाळून मागील ११ महिन्यांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील एक हजार ५५७ महिलांनी (Women) सासरच्यांविरुद्ध पोलिसांत धाव घेतली आहे. त्यात सोलापूर शहरातील ११७० तर ग्रामीणमधील ३८७ महिलांचा समावेश आहे. पण, त्यापैकी एक हजारांवर महिलांचे तुटू लागलेले संसार पोलिसांनी समुपदेशनातून पुन्हा जोडले.

(हेही वाचा – Jagdish Dhankar यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव फेटाळला)

पोलिसांत दाखल बहुतेक विवाहितांच्या (Women) तक्रारींमध्ये सासरच्यांनी घर बांधायला किंवा घर घ्यायला, नवीन गाडी घ्यायला, कर्ज फेडायला, व्यवसाय टाकायला, अशा कारणांसाठी माहेरहून पैसे आण म्हणून छळ केल्याचेच नमूद आहे. विवाहात दागिने दिले नाहीत, महागड्या वस्तू दिल्या नाहीत अशा कारणांसाठी देखील विवाहितांचा छळ सुरु असल्याचे पोलिसांत दाखल प्रकरणांवरुन दिसून येते. याशिवाय माहेरील लोक सतत मुलीला काहीही ना सांगतात आणि त्यांचे ऐकून विवाहिता सासरी वावरते. त्या रागातून सासरच्यांकडून विवाहितेला (Women) घालून पाडून बोलले जाते किंवा अनेकदा पतीसोबत भांडणे होतात.

(हेही वाचा – मराठी साहित्य संमेलनाच्या माहितीपत्रकात Veer Savarkar यांचे छायाचित्रच नाही; आक्षेप घेतल्यावर आयोजकांचे अजब स्पष्टीकरण)

दुसरीकडे सासरकडील लोक विशेषत: विवाहितेची नणंद, सासू तिच्या पतीच्या मनात काहीतरी भरवतात आणि त्यातून विवाहितेचा छळ केला जातो, अशीही उदाहरणे खूप आहेत. तसेच वंशाला दिवा म्हणून मुलगा झाला किंवा होत नाही आणि सतत फोनवरच बोलत राहते, अशा संशयातूनही विवाहितेचा (Women) छळ केला जात असल्याचे पोलिसांतील तक्रारीतून दिसून येते. गंभीर बाब म्हणजे विवाहापूर्वी सात जन्मांच्या शपथा घेणारे अनेकजण विभक्त होण्यासाठी म्हणजेच घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात धाव घेत आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.