Women Suicide Atal Setu : वरळी सी लिंक पाठोपाठ अटल सेतु बनला आत्महत्येचा नवीन स्पॉट

डॉक्टर महिलेने अटल सेतुवरून घेतली उडी, मृतदेहाचा शोध सुरू

341
Suicide : घाटकोपरच्या व्यावसायिकाची वांद्रे सिलिंक वरून उडी घेऊन आत्महत्या

मुंबई-वरळी-वांद्रे सी लिंक (Worli-Bandra Sea Link) वरून उडी घेऊन अनेकांनी आपले आयुष्य संपवले आहे. वरळी सी-लिंक पाठोपाठ आता शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू (Shivadi-Nhava Sheva Atal setu) हा आत्महत्येचा नवीन स्पॉट बनतो की काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मुंबईतील एका डॉक्टर महिलेने नैराश्यातून अटल सेतू वरून उडी घेतल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. या महिलेच्या मृतदेहाचा शोध घेण्यात येत असून अद्याप पोलिसांच्या हाती तिचा मृतदेह मिळून आलेला नाही. ही घटना नवी मुंबई न्हावाशेवा पोलिसांच्या हद्दीत घडली असून न्हावाशेवा पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. (Women Suicide Atal Setu)

शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू वरून एका महिलेने सोमवारी दुपारी उडी मारल्याची माहिती एका टॅक्सी चालकाने न्हावाशेवा पोलिसांना दिली. न्हावाशेवा पोलिसांनी सागरी पोलिसांच्या मदतीने तसेच अग्निशमन दल, नौदलाच्या मदतीने या महिलेचा शोध सुरू केला परंतु ही महिला मिळून आली नाही. दरम्यान टॅक्सी चालकाने दिलेल्या माहितीनुसार ही महिला दादर येथून टॅक्सीने न्हावाशेवा येथे जाण्यासाठी निघाली होती, अटल सेतुवर तीने टॅक्सी थांबवून अटल सेतू वरून समुद्रात झेप घेतली. न्हावाशेवा पोलिसांनी महिलेची ओळख पटविण्यासाठी मुंबईतील भोईवाडा पोलिसांशी संपर्क साधला असता सदर महिलेच्या कुटुंबियांनी हरवल्याची तक्रार भोईवाडा पोलिसांत दिली होती. (Women Suicide Atal Setu)

(हेही वाचा – Baramati Lok Sabha Constituency : विजय शिवतारेंच्या विरोधाचा अजित पवारांना बसणार फटका; काय आहेत त्यामागील कारणे? )

भोईवाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष बोराटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला डॉक्टर असून गेल्या आठ वर्षांपासून नैराश्याने त्रस्त होती. “तिला बाहेर काम आहे असे सांगून ती सोमवारी सकाळी घरून निघून गेली, “ती घरी न परतल्याने सोमवारी दुपारी तिच्या वडिलांनी हरवल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर कुटुंबियांनी तिने लिहिलेली चिठ्ठी सापडली, ज्यामध्ये ती आत्महत्या करण्यासाठी अटल सेतूवर जात असल्याचे लिहिले होते. ज्या टॅक्सी ड्रायव्हरने ती प्रवास करणार आहे, त्याचा छळ करू नये, असेही तिने स्पष्टपणे चिठ्ठीत लिहले होते. ही चिठ्ठी मिळाल्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आणि ती महिला दादरहून दुपारी १.४५ वाजता टॅक्सीत बसल्याचे आढळले. भोईवाडा पोलिसांनी न्हावाशेवा पोलिसांशी संपर्क साधला तोपर्यंत ते महिलेचा शोध घेत होते. तेव्हापासून किनारपट्टी सुरक्षा पोलिस, न्हावाशेवा पोलिस, भोईवाडा पोलिस आणि मुंबईतील मोटार वाहतूक पोलिस तिचा शोध घेत आहेत. (Women Suicide Atal Setu)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.