Women : दाम्पत्याला दोन महिलांनी ठार मारण्याचा केला प्रयत्न; गुन्हा दाखल

84
Women : दाम्पत्याला दोन महिलांनी ठार मारण्याचा केला प्रयत्न; गुन्हा दाखल
  • प्रतिनिधी 

जुहू येथे राहणाऱ्या एका मराठी दाम्पत्याला दोन उत्तर भारतीय महिलांनी ठार मारण्याचा प्रयत्न केला. या महिलांनी दाम्पत्याच्या डोक्यात फरशीने प्रहार केला असून या जीवघेण्या हल्ल्यात दाम्पत्य गंभीर जखमी झाले असून त्यांना कूपर रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. शुक्रवारी दुपारी घडलेल्या या हल्ल्याप्रकरणी जुहू पोलिसांनी दोन्ही महिलांवर हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. (Women)

अमृत निकम आणि आशा निकम असे जखमी दाम्पत्यांचे नाव आहे. जुहू येथील एन. एस. रोड वरील गॉड गिफ्ट सोसायटीत राहणारे हे दाम्पत्याचा त्याच ठिकाणी राहणाऱ्या सिमरन पांडे आणि नितु पांडे या महिलांसोबत भटक्या कुत्र्यांना सोसायटीच्या आवारात खाणे देण्यावरून वाद होता. अमृत निकम यांनी या दोघीना भटक्या कुत्र्यांना सोसायटीच्या आवारात खाणे देण्यास मनाई केली होती. तेव्हापासून सिमरन आणि नितु या दोघी क्षुल्लक क्षुल्लक गोष्टीवरून निकम दाम्पत्यासोबत भांडत होते. अनेक वेळा या दोघी निकम दाम्पत्य आणि त्यांच्या मुलांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत होत्या. (Women)

(हेही वाचा – Amrit Bharat Station Scheme अंतर्गत कुर्ला स्टेशनच्या सुधारणा प्रकल्पास विलंब)

शुक्रवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास अमृत निकम हे घरी जेवायला आले होते, व ते आपली मोटारसायकल सोसायटीच्या बाहेर, पार्क करीत असताना सिमरन आणि नितु या दोघी त्या ठिकाणी आल्या आणि सिमरन थेट अमृत यांच्या अंगावर धावून गेली आणि शिवीगाळ करू लागली, तिचा आरडाओरडा ऐकून निकम यांची आशा पतीच्या बचावासाठी आली होती. दरम्यान सिमरन आणि नितु या दोघींना जमिनीवर पडलेल्या फरशी उचलून या निकम दाम्पत्याच्या डोक्यात फरशीने प्रहार केला. (Women)

या हल्ल्यानंतर या दोघी तेथून पळून गेल्या, या हल्ल्यात निकम दाम्पत्य गंभीररित्या जखमी झाले. त्यांना स्थानिकांनी तात्काळ उपचारासाठी कूपर रुग्णालयात दाखल केले. हा सर्व प्रकार घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. या घटनेची माहिती मिळताच जुहू पोलिसांनी रुग्णालयात धाव घेऊन जखमी अमृत निकम यांचा जबाब नोंदवून सिमरन आणि नितु पांडे या दोघीविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. (Women)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.