जगप्रसिद्ध चित्रकार Sayed Haider Raza यांची अडीच कोटींची पेंटिंग चोरीला, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

137
जगप्रसिद्ध चित्रकार Sayed Haider Raza यांची अडीच कोटींची पेंटिंग चोरीला, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल
  • प्रतिनिधी

देशातील जगप्रसिद्ध चित्रकार सय्यद हैदर रझा (Sayed Haider Raza) यांच्या कोट्यवधी रुपये किमतीची पेंटिंग चोरीला गेल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे, रझा यांच्या बेलोर्ड पियर येथील गोदामातून या पेंटिंगची चोरी झाली आहे. या प्रकरणी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष धनवटे यांनी दिली.

(हेही वाचा – Defense Ministry ची एअरो इंजिन्ससाठी एचएएलसोबत 26 हजार कोटींच्या करारावर स्वाक्षरी)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरीला गेलेली पेंटिंग जगप्रसिद्ध चित्रकार एस. एच. रझा (Sayed Haider Raza) यांनी १९९२ साली कॅनव्हासवर ॲक्रेलिकवर बनवलेले ‘नेचर’ नावाचे पेंटिंग होते. ‘नेचर’ पेंटिंगची किंमत अंदाजे अडीच कोटी रुपये आहे. हे पेंटिंग बॅलार्ड पिअर येथील गुरू ऑक्शन हाऊस प्रायव्हेट लिमिटेडच्या गोदामात विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. पोलीस अधिकाऱ्यानी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने गोदामात घुसून हे पेंटिंग चोरले आहे. हे पेंटिंग बॅलार्ड पिअर येथील गुरू ऑक्शन हाऊस प्रायव्हेट लिमिटेडच्या गोदामात विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. कोविडच्या काळात हे पेंटिंग गोदामात ठेवण्यात आले होते, दोन वर्षांनी रझा याच्या पेंटिंगचा शोध घेण्यासाठी गोदाम उघडले असता हे पेंटिंग मिळून आले नाही, रझा यांच्या निकटवर्तीय यांनी या प्रकरणी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता, या तक्रार अर्जावरून अज्ञात व्यक्ती विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक संतोष धनवटे यांनी दिली.

(हेही वाचा – विवान कारुळकर यांच्या ‘सनातन धर्म : सर्व विज्ञानाचा खरा स्रोत’ पुस्तकाचे लालबागच्या राजाच्या दरबारी प्रकाशन)

गोदामात तसेच परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले मात्र त्यात दोन ते महिन्यांचे फुटेज असल्यामुळे चोरी करतानाचे फुटेज मिळून आलेले नसल्याची माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली. चोरीला गेलेल्या पेंटिंग आणि चोरट्याचा शोध घेण्यासाठी गुन्हा प्रकटीकरण पथक कामाला लागले असून लवकरच या गुन्ह्याचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

(हेही वाचा – ED ने दिल्लीऐवजी कोलकातामध्ये यावे, अशी मागणी करणारी TMC चे अभिषेक बॅनर्जी यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली)

चित्रकार सय्यद हैदर रझा कोण आहेत?

चित्रकार एस. एच. रझा (Sayed Haider Raza) हे भारतातील अशा कला नायकांपैकी एक आहेत ज्यांनी भारतीय चित्रकलेची आधुनिकता व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पेंट आणि ब्रशच्या साह्याने भारतीय चित्रकलेला जागतिक रंगमंचावर नवी ओळख देणारे सय्यद हैदर रझा यांची त्यांच्या पिढीतील अव्वल चित्रकारांमध्ये गणना होते. ते चित्रकलेच्या जगात हिंदू आणि बौद्ध धर्माच्या तांत्रिक पैलूंवर आपली छाप सोडण्यासाठी ओळखले जातात.

ते बॉम्बे प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुप (PAG) च्या सह-संस्थापकांपैकी एक होते. त्यांनी नागपूर स्कूल ऑफ आर्टमध्ये शिक्षण घेतले आणि सर जे.जे. बॉम्बे येथील स्कूल ऑफ आर्टमध्ये शिक्षण घेतले. रझा पॅरिसला १९५०ते १९५३ या काळात इकोले नॅशनल सुपरिएर डेस ब्यूक्स-आर्ट्समध्ये शिकण्यासाठी गेले. त्याने आपले बहुतेक आयुष्य पॅरिस आणि गोर्बेक्स, फ्रान्समध्ये घालवले. सय्यद हैदर रझा यांचे २३ जुलै २०१६ रोजी नवी दिल्ली येथे निधन झाले. चित्रकलेच्या शैलीतील त्यांच्या विशेष योगदानाबद्दल त्यांना २०१३ मध्ये पद्मविभूषण, २००७ मध्ये पद्मभूषण आणि २०१५ मध्ये लीजन ऑफ ऑनरने सन्मानित करण्यात आले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.