वरळीतील हिट अँड रन (Worli Hit and Run) प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. वरळीत महिलेला कारने चिरडणारा आरोपी शिवसेना नेते राजेश शहा यांचा मुलगा असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. सध्या पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. अपघाताच्या वेळी आरोपी मिहिर शहा (Mihir Shah) आणि चालक पांढऱ्या रंगाच्या बीएमडब्ल्यू कारमध्ये होते, असेही पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. पोलीस मिहीर शहा याचा शोध घेत आहेत असून, बीएमडब्ल्यू कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. (Worli Hit and Run)
अपघातानंतर मिहिर शहा पळून गेल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी मिहीरचे वडील राजेश शहा यांना ताब्यात घेतले. वरळी हिट अँड रन (Worli Hit and Run) प्रकरणाच्या तपासासाठी आरटीओ आणि फॉरेन्सिक टीमला वरळी पोलिसांनी वाहन तपासणीसाठी पाठवले आहे. पोलीस सध्या मिहिरचे लोकेशन ट्रेस करत असून, मिहीर गोरेगाव येथे राहणाऱ्या मैत्रिणीच्या घरी गेल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. (Worli Hit and Run)
मिहीरच्या वडिलांनंतर वरळी पोलिसांनी त्याच्या प्रेयसीलाही ताब्यात घेतले आहे. आरोपी मिहीर हा सकाळी आठ वाजता मैत्रिणीच्या घरातून वांद्रे येथील मित्राकडे जात असल्याचे सांगून गोरेगावहून निघून गेला होता. त्यानंतर त्याने फोन बंद केला. दरम्यान, वरळी पोलिसांचे (Worli Police) दुसरे पथक वांद्रे येथे रवाना झाले आहे. (Worli Hit and Run)
(हेही वाचा – गेट बाहेर न येणारे आता बांधावर पोहोचले; CM Eknath Shinde यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल)
अट्रिया मॉलजवळील (Atria Mall) वरळी कोळीवाडा (Worli Koliwada) परिसरात राहणारे कोळी दाम्पत्य मासळी लिलावासाठी ससून डॉक येथे जाण्यासाठी सकाळी घरातून निघाले होते. परतत असताना दाम्पत्याच्या दुचाकीला चारचाकी वाहनाने धडक दिली. पती थोडक्यात बचावला पण पत्नीला जीव गमवावा लागला. पतीचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि दोघेही चारचाकीच्या बोनेटवर पडले. परिस्थिती पाहून पतीने बोनेटवरून उडी मारली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे चारचाकी चालक घाबरला. त्यानंतर चालक पळून गेला. या अपघातात पती थोडक्यात बचावला. तर महिला गंभीर जखमी झाली. महिलेला तातडीने मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केले. (Worli Hit and Run)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community