वरळी हिट अँड रन घटनेनंतर (Worli hit and run) महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग (Excise Department) ॲक्शन मोडवर आलं आहे. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जुहू परिसरात वाईस ग्लोबल बारवर कारवाईला सुरुवात केली आहे. वाईस ग्लोबल तपास बारमधून आरोपी मिहीर शाह शनिवारी रात्री आपल्या मित्रांसोबत दारू पार्टी करून बाहेर निघाला होता. त्यानंतर आरोपीकडून वरळी परिसरात हिट अँड रान केसची घटना घडली आणि त्यामध्ये एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. (Worli hit and run)
बार रात्री उशिरापर्यंत चालू होता का?
मुंबई पोलिसांसोबत आता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईला देखील वेग आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दोन टीम बारमध्ये सध्या माहिती घेऊन कारवाई करत आहे. बारमध्ये महाराष्ट्र शासनाच्या सर्व नियमाचं पालन केलं जात होतं का? आणि हा बार रात्री उशिरापर्यंत चालू होता का? या संदर्भात देखील माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून घेतली जात आहे. (Worli hit and run)
नेमकं काय घडलं?
मुंबईतील वरळीत असलेल्या प्रसिद्ध अॅट्रिया मॉलजवळ हिट अँड रनची घटना घडली आहे. अॅट्रिया मॉलजवळच असणाऱ्या वरळी कोळीवाडा परिसरात राहणारं कावेरी आणि प्रदीप नाकवा हे कोळी दाम्पत्य सकाळी माशांच्या लिलावासाठी ससून डॉकला जाण्यासाठी घराबाहेर पडलं होतं. मासे घेऊन दुचाकीवरुन परतत असताना दाम्पत्याच्या दुचाकीला एका चारचाकी गाडीनं धडक दिली. धडक दिल्यानंतरही चारचाकी गाडीच्या चालकाने गाडी न थांबवता तशीच पळवली. त्यात त्यानं बोनेटवर पडलेल्या कावेरी नाकवा यांना फरफटत नेलं. या अपघातात प्रदीप नाकवा हे थोडक्यात बचावले. मात्र कावेरी या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यानंतर कावेरी यांना तात्काळ मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता. डॉक्टरांनी कावेरी नाकवा यांना मृत घोषित केलं. या प्रकरणात आरोपी असलेल्या मिहीर शाह हा फरार असून त्याचे वडील हे राजेश शाह (Rajesh Shah) हे शिवसेना शिंदे गटाचे उपनेते आहेत. राजेश शाह यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून मिहीरचा शोध सुरू आहे. या प्रकरणात मिहीर सोबत असलेल्या ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे. (Worli hit and run)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community