Worli Hit and Run : मिहीरने व्हिस्की नंतर ४ बियरचे टीन रिचवले होते; पोलीस तपासात आले समोर

180
Worli Hit and Run : मिहीरने व्हिस्की नंतर ४ बियरचे टीन रिचवले होते; पोलीस तपासात आले समोर

वरळी हिट अँड रन प्रकरणात अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी मिहीर शहाने जुहू येथील बारमध्ये व्हिस्कीचे ४ पेग रिचवल्यानंतर मरीन ड्राईव्ह येथे जाताना मोटारीत बियरचे ४ कॅन संपवले होते अशी माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. दरम्यान मिहीरला त्याने केलेल्या कृत्याचा पश्चाताप होत असून आयुष्यातील सर्वात मोठी चूक आपल्याकडून झाली, या चूकीने माझे संपूर्ण करिअर संपवले, असे मिहीर तपास अधिकाऱ्यासमोर कबूल करीत असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. (Worli Hit and Run)

वरळीत रविवारी पहाटे झालेल्या ‘हिट अँड रन’च्या घटनेतील मुख्य आरोपी मिहीर शहा याला मंगळवारी विरार येथून वरळी पोलिसांनी अटक केली आहे. या अपघातात मिहीरचे वडील राजेश शहा आणि चालक राजऋषी बिदावत यांना रविवारीच अटक करण्यात आली होती. या घटनेनंतर मिहीर हा आपल्या कुटूंबियांसह पळून गेला होता. ६० तासांनी मिहीर हा पोलिसांच्या हाती लागला. मिहीर शहाचे वडील राजेश शहा हे पालघर जिल्ह्याचे शिवसेनेचे उपनेते होते, सोमवारी न्यायालयाने या प्रकरणात त्यांना जामिनावर सोडण्यात आले आहे. (Worli Hit and Run)

(हेही वाचा – दलित – आदिवासींचा निधी कर्नाटकात काँग्रेसने इतरत्र वळवला; Ad. Prakash Ambedkar यांचा आरोप)

मिहीर शहाला मंगळवारी अटक केल्यानंतर बुधवारी त्याला शिवडी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, मिहीरने पोलिसांकडे गुन्ह्याची कबुली दिली असून अपघातानंतर मी खूप घाबरलो होतो, मला काहीच सुचत नव्हते, मोटार थांबवली असती तर लोकांनी आम्हाला खूप मारले असते या भीतीने मी गाडी न थांबवता पळून गेलो, त्यानंतर पोलिसांच्या भीतीने मी लपून बसलो होतो, माझ्या आयुष्यातील ही सर्वात मोठी चूक होती, एका चूकीमुळे माझे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले असल्याची कबुली मिहीरने पोलिसांसमोर दिली आहे. (Worli Hit and Run)

पोलिसांच्या तपासात मिहीरने जुहू येथील बारमध्ये व्हिस्कीचे ४ पेग रिचवले होते. त्यानंतर त्याने, बीएमडब्ल्यू या मोटारीत बोरिवली ते मरीन ड्राईव्ह या प्रवासात ४ बिअरचे टिन रिचवले. मरीन ड्राईव्ह येथून परत जात असताना मिहीर लघुशंकेसाठी एका ठिकाणी थांबला, तेथून त्याने चालकाला बाजूला करून मोटारीचा ताबा स्वतः कडे घेतला होता अशी माहिती पोलीस तपासात समोर आली असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. दरम्यान जुहू येथील बार मालकाने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मी मिहीरला ओळखत नाही, परंतु त्याच्या सोबत असलेला त्याचा एक मित्र आमचा नियमित ग्राहक आहे, त्याच्यासोबत मिहीर बारमध्ये आला होता, मिहीरने आपले ओळखपत्र दाखवले त्यात त्याचे वय २७ होते असे बार मालकाने म्हटले आहे. (Worli Hit and Run)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.