Worli Hit and Run : बीएमडब्ल्यू हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शहाला पोलिसांकडून व्हीआयपी ट्रीटमेंट

Worli Hit and Run : काळ्या काचा असलेल्या ईर्टीगा कारमधून नेले न्यायालयात

141
Worli Hit and Run : बीएमडब्ल्यू हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शहाला पोलिसांकडून व्हीआयपी ट्रीटमेंट
Worli Hit and Run : बीएमडब्ल्यू हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शहाला पोलिसांकडून व्हीआयपी ट्रीटमेंट

बीएमडब्ल्यू हिट अँड रन (Worli Hit and Run) प्रकरणातील २३ वर्षीय आरोपी मिहीर शहा याला पोलिसांनी व्हीआयपी ट्रीटमेंट देत काळ्या काचा असलेल्या ईर्टीगा कारमधून मंगळवारी न्यायालयात नेले. न्यायालयाच्या आवारातील एका खोलीमध्ये सात ते आठ जणांना मिहीरला भेटायला देण्यात आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, या प्रकरणात आरोपी मिहीर शहा (Mihir Shah) याला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

मद्यधुंद अवस्थेत बीएमडब्ल्यू कार घेऊन ७ जुलैच्या पहाटे लाँग ड्राईव्हसाठी निघालेल्या मिहीर शहा याने वरळीतील डॉ. ॲनी बेझंट मार्गावरून जाताना मच्छीमार प्रदिप नाखवा (Pradeep Nakhawa) (वय ५०) यांच्या दुचाकीला धडक दिली. अपघातानंतर पळून जाताना त्याने नाखवा यांच्या पत्नी कावेरी (Kaveri) (४५) यांना दीड किलोमीटरहून अधिक अंतर फरफटत नेले. यात गंभीर जखमी झालेल्या कावेरी यांचा मृत्यू झाला आहे.  (Worli Hit and Run)

(हेही वाचा- Ashadhi Ekadashi 2024 : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न, बळीराजासाठी मागितले मागणे)

अपघातानंतर दोन दिवस मिहीर (Mihir Shah) पोलिसांना सापडत नव्हता अखेर, वरळी पोलिसांनी मिहीरला ९ जुलैला विरार फाटा येथून ताब्यात घेत बेड्या ठोकल्या. न्यायालयाने त्याला सुनावलेली पोलीस कोठडीची मुदत मंगळवारी संपली. त्यामुळे वरळी पोलिसांनी त्याला न्यायालयासमोर हजर केले. धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनी त्याला पोलीस वाहनातून न्यायालयात न नेता काळ्या काचा असलेल्या खासगी ईर्टीगा कारमधून न्यायालयात नेले. (Worli Hit and Run)

न्यायालयाच्या आवारातील एका खोलीमध्ये सात ते आठ जणांना मिहीरला भेटायला देण्यात आले. न्यायालयाने मिहीरला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर पोलिसांनी त्याला त्याच काळ्या काचा असलेल्या खासगी ईर्टीगा कारमधून कारागृहापर्यंत नेले. या वेळी पोलिसांच्या गाड्यांच्या ताफ्यासोबत मिहीरला भेटायला आलेल्या खासगी गाड्यांचा ताफा होता.  (Worli Hit and Run)

(हेही वाचा- Maratha Reservation: …मग तुम्ही मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण का नाही दिल? अजित पवार गटाचा मविआला सवाल)

हिट अँड रन प्रकरणातील आरोपी असलेले शिवसेना नेते राजेश शहा (Rajesh Shah) यांचा मुलगा मिहीर याला पोलिसांकडून मिळालेल्या व्हीआयपी ट्रीटमेंटमुळे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पोलिसांनी आरोपी मिहीरकडून अपघाताच्या वेळी घातलेले कपडे, लॉंग ड्राईव्ह दरम्यानसुद्धा बियर रिचवलेले कॅन जप्त केले आहेत. तसेच, या प्रकरणात २७ जणांचे जबाब नोंदविले आहेत.  (Worli Hit and Run)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.