येरवडा मध्यवर्ती कारागृहामध्ये (Yerawada Jail) बंदिस्त असलेल्या मारहाणीच्या गुन्ह्यातील एका आरोपीने अन्य १० कैद्यांच्या मदतीने कारागृहात तुरुंग अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यास मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. तुरुंग अधिकारी शेरखान पठाण यांना लाथा बुक्क्यांनी कैद्यांनी मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना गुरूवारी (१५ फेब्रुवारी) सकाळी नऊच्या सुमारास घडली. (Yerawada Jail)
दोन दिवसांपूर्वी दहा ते बारा कैद्यांमध्ये आणि शेरखान पठाण यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याची माहिती समोर आली आहे. येरवडा कारागृहातील (Yerawada Jail) इतर अधिकारी या घटनेची माहिती घेत आहेत. आरोपींनी मारहाण केल्याने पठाण गंभीर जखमी झाले आहेत. आरोपींनी पठाण यांना शिवीगाळ केली. त्यावरून ही मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती आहे. (Yerawada Jail)
(हेही वाचा – Khar Subway आणि वांद्रे रेल्वे टर्मिनसला जोडणाऱ्या पुलांचे लवकरच बांधकाम)
येरवडा कारागृहामध्ये (Yerawada Jail) बंदिस्त असलेल्या विकी बाळासाहेब कांबळे (रा. बनेश्वर महादेव मंदिर जवळ, धनकवडी) या आरोपीवर कारागृह प्रशासनाने कारवाई करून त्याच्या विरोधात येरवडा (Yerawada Jail) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. येरवडा कारागृह प्रशासनाने यासंदर्भात माहिती देताना, विकी बाळासाहेब कांबळे हा आरोपी शहरातील धनकवडी भागातील रहिवासी आहे. सहकारनगर पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात मारहाण, धमकी देणे या कलमनुसार गुन्हे दाखल आहेत. २५ जानेवारी पासून तो कारागृहात बंदिस्त आहे. त्याचप्रमाणे न्यायाधीन बंदी प्रकाश विठ्ठल रेणुसे (रा. धनकवडी) याच्या विरोधात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा तसेच आर्म ॲक्टचा गुन्हा दाखल आहे. तो १७ फेब्रुवारी २०१८ पासून येरवडा कारागृहात दाखल आहे. (Yerawada Jail)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community