सेक्सटॉर्शनला बळी पडला अन् तरुणाने केली आत्महत्या; आढळले राजस्थान कनेक्शन

youth from Rajasthan arrested in Pune sextortion-suicide case
सेक्सटॉर्शनला बळी पडला अन् तरुणाने केली आत्महत्या; आढळले राजस्थान कनेक्शन

सेक्सटॉर्शनची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहेत. पुण्याचा सहकारनगरच्या पोलिसांनी आता मोठी कारवाई केली आहे. एका तरुणाच्या आत्महत्येचा तपास करत असताना पुण्यातील आणखीन एक गाव सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकल्याचे समोर आले आहे. यासाठी पुणे पोलीस राजस्थानात ८ दिवस तळ ठोकून होते. दरम्यान आत्महत्या प्रकरणातील आरोपीला अटक केली असून पुण्यात १४०० सेक्सटॉर्शनच्या तक्रारी दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.

नक्की काय घडले?

नुकतीच पुण्यातील सहकारनगरमधील एका तरुणाने सेक्सटॉर्शनला बळी पडून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्या तरुणाने एक व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल केला होता. त्यानंतर त्या तरुणाने न्यूड व्हिडिओ बनवला. मग तरुणाला तो न्यूड व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देत पैशांची मागणी केली गेली. तो घाबरला, त्याने बदनामी होईल म्हणून फोन पेद्वारे पैसे पाठवले. पण त्यानंतरही पैशांची मागणी सतत केली जाऊ लागली. मग तरुणाने मी आत्महत्या करत असल्याचा मेसेज पाठवला. मात्र तरीही आरोपी ‘कर मी व्हिडिओ ऑनलाईन करतो’, असे म्हणत सतत पैशांची मागणी करत राहिला. या त्रासाला कंटाळून शेवटी त्या तरुणाने आत्महत्या केली.

याप्रकरणाचा तपास करत पुण्याच्या सहकारनगर पोलिसांनी राजस्थानमधील भरतपूर परिसरातील रायपूर सुकेती गाव गाठले. येथे पोलिसांनी आठ दिवस तपास करून प्रकरणातील २४ वर्षीय तरुणाला गजाआड केले. माहितीनुसार, पुण्यात सेक्सटॉर्शनच्या प्रकरणात १४०० तक्रारी दाखल झाल्या आहेत.

(हेही वाचा – पुण्यात कोयता गँगची दहशत थांबेना; झोपलेल्या ज्येष्ठ नागरिकांवर केला हल्ला)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here