Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत एका महिलेसह १० नक्षलवादी ठार; शस्त्रास्रे जप्त

173
Chhattisgarh: छत्तीसगडमध्ये चकमकीत एका महिलेसह १० नक्षलवादी ठार; शस्त्रास्रे जप्त

छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या जवानांसोबत झालेल्या चकमकीत एका महिलेसह १० नक्षलवादी ठार झाले. घटनास्थळावरून एक लाइट मशीनगन, एक ३०३ रायफल, एक १२ बोअरची बंदूक, मोठ्या प्रमाणात बॅरल ग्रेनेड लाँचर, गोळे, इतर शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. (Chhattisgarh)

पोलीस महानिरीक्षक (बस्तर रेंज) (Inspector General of Police) सुंदरराज पी. यांनी सांगितले की, मंगळवारी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास गांगलूर पोलीस ठाण्यांतर्गत लेंद्रा आणि कोरचोली गावांमध्ये ही चकमक झाली. येथे सुरक्षा दलाच्या जवानांचे संयुक्त पथक नक्षलविरोधी अभियानावर होते. गोळीबार थांबल्यानंतर घटनास्थळावरून ४ नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आणि नंतर शोधकार्यात चकमकीच्या ठिकाणी आणखी ६ मृतदेह आढळले. नक्षलवाद्यांची ओळख अद्याप पटली नाही.

(हेही वाचा – Congress नेते संजय निरुपम शिवसेनेच्या (शिंदे) वाटेवर? )

नक्षलवादी दरवर्षी मार्च ते जून या काळात टॅक्टिकल काउंटर ऑफेन्सिव्ह मोहिमा राबवतात व आपल्या कारवाया तीव्र करतात. यापूर्वी २७ मार्च रोजी विजापूरच्या बासागुडा भागात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ६ नक्षलवादी ठार झाले होते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.