छत्तीसगडमधील (Chhattisgarh) सुकमा जिल्ह्यात (Sukma District) पोलिसांनी (Police) 10 नक्षलवाद्यांना (Naxalites) चकमकीत ठार केले आहे. चकमक स्थळावरून ठार झालेल्या नक्षलवाद्यांची स्वयंचलित एसएलआर, एके-47 आणि इतर शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. नक्षलवाद्यांची माहिती मिळताच सुरक्षा दलाचे पथक कोरजुगुडा, दंतेशपुरम, नागराम भंडारपदर येथे रवाना झाले होते. यादरम्यान कोरजुगुडा आणि भंडारापदरच्या जंगलात डीआरजी जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली.
शोध मोहीम सुरू
गोळीबारात सुरक्षा दलांनी 10 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. घटनास्थळावरून AK-47, INSAS रायफल, SLR बंदूक आणि इतर स्फोटक साहित्य जप्त करण्यात आले आहे. चकमकीनंतर सुरक्षा दलाचे जवान छावणीत परतत आहेत. मारले गेलेले सर्व नक्षलवादी ओरिसा मार्गे छत्तीसगडच्या सीमेत घुसले होते. याबाबत माहिती मिळताच नक्षलवाद्यांचा पाठलाग करून त्यांना ठार करण्यात आले. चकमक झालेल्या ठिकाणी शोध सुरू आहे.
डीआरजी सैनिक आणि माओवाद्यांमध्ये चकमक
एसपी किरण चव्हाण यांनी सांगितले की, सुकमा जिल्ह्यातील दक्षिणेकडील भेज्जी येथे नक्षल संघटनेच्या बस्तर विभागातील माओवाद्यांची माहिती खबऱ्याकडून मिळाली होती. त्यानंतर डीआरजी टीम शोध मोहिमेसाठी पाठवण्यात आली. दरम्यान, आज सकाळी 6 वाजता भेज्जीच्या जंगलात डीआरजी जवान आणि माओवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. सुरक्षा दल परतल्यानंतर याबाबत सविस्तर माहिती दिली जाईल, असे ते म्हणाले.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community