१०० सैनिकी शाळा सुरु होणार!

131

देशभरात 100 नवीन सैनिक शाळा स्थापन करण्याचा विचार संरक्षण मंत्रालयाचा आहे. यात स्वयंसेवी संस्था आणि खासगी शाळा यांच्या भागीदारीत 21 सैनिकी शाळा स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या नवीन शाळा सध्याच्या सैनिक शाळांपेक्षा वेगळ्या असणार आहेत.

काय आहे नवीन सैनिकी शाळांच्या उभारणी मागील उद्देश? 

विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी सुसंगत दर्जेदार शिक्षण देणे आणि त्यांना सशस्त्र दलात सामील होण्यासह उत्तम करिअरच्या संधी देणे, असा 100 नवीन सैनिक शाळा स्थापन करण्यामागील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्देश आहे. आजच्या तरुणांना उद्याचे जबाबदार नागरिक बनवणे आणि राष्ट्र उभारणीच्या कामात सरकारसोबत त्यांचाही सहभाग घेणे यासाठीचा प्रयत्न यात असणार आहे. या नवीन सैनिक शाळा, संबंधित शिक्षण मंडळांशी त्यांच्या संलग्नतेव्यतिरिक्त, सैनिक स्कूल सोसायटीच्या मदतीने काम करतील आणि सोसायटीने विहित केलेल्या भागीदारी पद्धतीने नवीन सैनिक शाळांसाठी नियम व नियमांचे पालन करतील, असे संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

(हेही वाचा बुरखा घातला म्हणून विरोध केला, तर हॉटेलच पाडले बंद!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.