चीनच्या १८ लढाऊ विमानांची तैवानमध्ये घुसखोरी 

112

CHINA TAIWAN

तैवान – चीन आणि तैवान यांच्यातील वादात अमेरिका कायम तैवानला पाठिंबा देत आहे, त्यामुळे संतप्त चीनने शुक्रवारी रात्री तब्बल १८ लढाऊ विमाने तैवानच्या हद्दीत घुसवून अप्रत्यक्षपणे थेट अमेरिकेला आव्हान दिले. या वेळी तैवानमध्ये अमेरिकेचे दूत कैथ क्रैच हे तैवानच्या दौऱ्यावर  होते.

चायना पीपल्स लिबरेशन आर्मी अर्थात चिनी सैन्य हे तैवानच्या हद्दीत जाऊन युद्धाभ्यास करत होते. यावेळी चीनने तैवानच्या हद्दीत १८ लढाऊ विमाने घुसवून शक्ती प्रदर्शन केले. यात १६ लढाऊ विमाने आणि २ बॉंबर्स विमानांचा समावेश होता. एच-६ हे बॉंबर्स विमान, जे-१६ ही ८ लढाऊ विमाने तर जे-११ जातीची ४ आणि जे-१० जातीच्या ४ लढाऊ विमानांचा या १८ विमानांमध्ये समावेश होता. चीन कायम त्याच्या शेजारील देशांना त्रास देत असतो.

मागील आठवड्यातही केलेली घुसखोरी  

बुधवारीही चीनने एका शेजारी देशामध्ये २ लढाऊ विमाने घुसवली होती. जेंव्हा त्या देशाच्या वायुसेनेने त्यांना परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी देताच चिनी लढाऊ विमाने पळून गेली. हि घटनाही तेंव्हाच घडली जेव्हा त्या देशातही अमेरिकेचा वरिष्ठ नेता त्या देशात आला होता. याआधीही बुधवारी दोन लढाऊ विमानांनी तैवानमध्ये घुसखोरी केली होती. त्यावेळी तैवान वायुदलाने तातडीने चिनी हवाई दलाच्या लढाऊ विमानांना परत जाण्यास सांगितले, अन्यथा परिणामाला सामोरे जावे लागेल, अशी धमकी दिली. तेव्हा ती विमाने परत पळाली.

चीनला घाबरत नाही – तैवानचे राष्ट्रपती  

चीन अनेकदा तैवानच्या हवाई आणि समुद्री सीमेमध्ये घुसखोरी करतो. या प्रकरणी तैवानने अनेकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर तक्रार केली होती. मागील आठवड्यात चीन आणि तैवान यांनी त्यांच्या त्यांच्या समुद्री हद्दीत युद्धाभ्यास केला. त्यावेळी चीनने तैवानच्या ताब्यात असलेली बेटे ही चीनची आहेत, असा दावा केला होता. मात्र तैवानने हा दावा फेटाळून लावला. तैवानचे राष्ट्रपती साई इंग वेन हे याच वर्षी जानेवारीत निवडून आले होते, निवडून येताच त्यांनी चीनच्या समोर झुकणार नाही. तैवानकडे अधिकतर शस्त्रास्त्रे हि अमेरिकेतील आहेत. तैवानच्या सैन्यांना अमेरिकाच प्रशिक्षण देत असते. जरी चीनकडे तैवानपेक्षा अधिक शस्त्रे आणि सैनिक आहेत तरीही तैवान चीनला घाबरत नाही, असे साई इंग वेन म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.